विद्यार्थिनीवर अत्याचार करणारे दोघे गजाआड

By Admin | Updated: April 3, 2015 00:40 IST2015-04-02T22:48:46+5:302015-04-03T00:40:58+5:30

मुलीवर अत्याचार करणा-या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अजान अली आणि खुर्शीद दोघेही २० वर्षे (रा. उत्तर प्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत.

Two men abusing the girl | विद्यार्थिनीवर अत्याचार करणारे दोघे गजाआड

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारे दोघे गजाआड

डोंबिवली : मुलीवर अत्याचार करणा-या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अजान अली आणि खुर्शीद दोघेही २० वर्षे (रा. उत्तर प्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत.
या दोघांनीही या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. त्या संदर्भात पीडित मुलीच्या आईसह मुलीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार माहिती मिळताच या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्यासह पथकाने शोधकार्य सुरु केले.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी जेथे राहते त्याच्याच बाजूच्या इमारतीत दोघे आरोपी मजूरीचे काम करीत होते. त्यांनी या मुलीला शाळेत येता-जातांना बघितले होते. तेव्हाच त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचे ठरवले असावे.
हे दोघेही घटनेनंतर गावी पळून जाण्याच्या बेतात असतांनाच पोलिसांनी त्यांना मुंब्रा येथून अटक केली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच या आरोपंीचा शोध घेत अटक केली. पीडित मुलीची प्रकृति स्थिर असल्याचेही रणदिवे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Two men abusing the girl