शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

काळ आला होता पण... सावंतवाडीत दोन मुली अपघातातून थोडक्यात बचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:58 PM

दैव बलवत्तर असेल तर कोणतीही घटना घडो, त्यातून सहीसलामत बाहेर पडणारच. असाच प्रकार शुक्रवारी रात्री सावंतवाडीत अनुभवयास मिळाला.

 सावंतवाडी  - दैव बलवत्तर असेल तर कोणतीही घटना घडो, त्यातून सहीसलामत बाहेर पडणारच. असाच प्रकार शुक्रवारी रात्री सावंतवाडीत अनुभवयास मिळाला. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडाची एक फांदी विद्युत वाहिन्यांवर कोसळताच सर्व विद्युत वाहिन्याखाली आल्या. त्याच वेळी तेथून दोन छोट्या मुली जात होत्या. त्या तेथेच थांबल्या. मात्र विद्युत वाहिन्या त्यांच्यासमोर पडल्या, पण त्यांना काही झाले नाही आणि त्या थोडक्यात बचावल्या. मात्र ही फांदी पडून दोन दुचाकींचे नुकसान झाले.सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर आंब्याचे एक झाड आहे. या झाडाच्या काही फांद्या कोरम झाल्या होत्या. त्यातील एक फांदी आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळली. ही फांदी कोसळली ती विद्युत तारांवर. त्यामुळे सर्व विद्युत वाहिन्या खाली आल्या होत्या. त्याच वेळी तेथून शन्वी सुतार व अन्वी सावंत या दोन बालिका जात होत्या. झाडाची फांदी कोसळताच त्या दोन्ही बालिका तेथेच थांबल्या. त्याच वेळी आजूबाजूला मोठी वर्दळ असल्याने या फांद्या मुलींच्या अंगावर पडल्या, असे वाटल्याने सर्वच जण आरडाओरड करू लागले. त्यातच विद्युत वाहिन्यांना चुकून या मुली हात लावतील, अशीही भीती वाटू लागली. पण सुदैवाने असे काही झाले नाही.या दोन्ही मुली झाडाची फांदी पडताच एका जागेवर शांत उभ्या राहिल्या होत्या. त्याचवेळी तेथे असलेल्या काही पोलिसांनी तसेच पोलीस ठाण्यात आलेल्यांनी या मुलींना बाजूला केले. मात्र झाडाची फांदी कोसळल्याने तेथे लावण्यात आलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दुचाकी या झाडाच्या खाली अडकून पडल्याचे दिसत होते.तसेच विद्युत वाहिनी कोसळल्याने पोलीस ठाणे तसेच पोलीस लाईन परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. पोलिसांनी विद्युत विभागाला माहिती दिल्यानंतर विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी विद्युत वाहिन्या बाजूला केल्या होत्या. पण उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या