शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

आडाळी लाँग मार्चला पाठींबा देण्यावरून भाजपातच दोन गट, परशुराम उपरकर यांचा आरोप 

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2023 18:46 IST

आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले

सावंतवाडी : आडाळी येथून निघालेल्या लाँग मार्च ला भाजप मधील एका गटाने पाठींबा दिला तर दुसरा गट सरकारची बदनामी करणारे कृत्य योग्य नाही म्हणतो मग खरा कोणाचे मानायचे या निमित्ताने भाजप मध्ये दोन ते तीन गट असल्याचे दिसून आले अशी टिका मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी  माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक आदी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, दीपक केसरकर यांनी अशी कोणती जादूची कांडी फिरविली की कायम विरोधात बोलणारे नारायण राणे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. या मागचे नेमके गमक काय? कोणत्या मुद्दावर ते एकत्र आले की ही सर्वसामान्य मतदारांची फसवणूक आहे? जिल्ह्याच्या भाजपात दोन ते तीन गट पडले आहेत. त्यामुळे सर्वजण एकमेकाला संपवायला निघाले आहेत. याचाच परिपाक दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पहायला मिळाला. आपलेच लोक विरोधात गेले हे राणेंना अप्रत्यक्षरित्या कबूल करावे लागले, असेही त्यांनी सांगितले.केसरकर यांनी कायम स्वार्थी राजकारण केले आहे. दहशतवादाचा मुद्दा पुढे करुन त्यांनी नेहमी आपला स्वार्थ साधला आहे. पहिले ते शिवसेनेत गेले आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात मंत्रीपद मिळविले. या काळात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयर-सुतक राहिले नाही. त्यांनी जाहीर केलेली विकासकामे, रोजगाराभिमुख प्रकल्प आणि आश्वासने पुर्ण झालेली नाहीत.राणेंवर टिका राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. त्यानंतर ते उद्योगमंत्री होते. परंतु नंतरच्या दहा वर्षात त्यांना कोणताही विकास किंवा रोजगाराचा प्रकल्प आणण्यास का जमला नाही ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. फक्त सिंधुदुर्गाचा जीडीपी वाढला, असे सांगुन लोकांची दिशाभूल करू नये.आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले सिंधुदुर्गभाजपात आता दोन ते तीन गट पडले आहेत. जो तो एकमेकाला संपविण्यासाठी निघाला आहे. त्याचा प्रत्यय दोडामार्गमध्ये घेण्यात आलेल्या सभेच्यावेळी आला. त्या ठिकाणी एकमेकांवर टिका करणारे केसरकर, राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले, असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर BJPभाजपाDeepak Kesarkarदीपक केसरकर