शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 2:58 PM

वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज वितरणाच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, वीज कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्षशारदा कांबळे यांचा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

वैभववाडी : वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज वितरणाच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे यांनी दिला आहे.याबाबत शारदा कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वादळी पावसामुळे झाड कोसळल्याने वीजेचा खांब मोडून पडल्याची माहिती ग्रामस्थांसह आपणही वीज वितरणला कळविली. त्यामुळे लागलीच वीज वितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ घटनास्थळाची पाहणी करुन गेले. परंतु, २४ तास उलटून गेले तरी मोडलेला वीजेचा खांब बदलण्यासाठी वीज वितरणकडून कोणीही वाडीत फिरकलेले नाहीत. दोन दिवस वीज नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला आहे.एक खांब मोडून पडल्याने संपुर्ण बौद्धवाडीचा वीज पुरवठा दोन दिवस बंद असताना महावितरणच्या अधिका-यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्याच्या गावातील नैसर्गिक आपत्तीमुळे खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत वीज वितरण कंपनीकडून एवढा बेफिकीरपणा दाखवला जात असेल तर अन्य गावातील स्थिती काय असेल? याची कल्पनाच केलेली बरी, असे शारदा कांबळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.वीज पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याची खबरदारी घेऊन अधिका-यानी तातडीने कार्यवाही न केल्यास महावितरणच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शारदा कांबळे यांनी दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी