कोनाळ तिलारीवाडी येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 4, 2023 13:29 IST2023-11-04T13:28:41+5:302023-11-04T13:29:37+5:30

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ):  तालुक्यातील कोनाळ तिलारीवाडी येथे शेतविहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. कोनाळ तिलारीवाडी ...

Two cows died after falling into a farm well in Konal Tilariwadi | कोनाळ तिलारीवाडी येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू

कोनाळ तिलारीवाडी येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू

दोडामार्ग (सिंधुदुर्ग):  तालुक्यातील कोनाळ तिलारीवाडी येथे शेतविहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

कोनाळ तिलारीवाडी येथील ब्रह्मनंद शेटवे यांच्या शेतातील विहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी वनपाल किशोर जंगले, विश्राम कुबल, प्रकाश गवस, बाळकृष्ण सावंत, वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस रानटी प्राणी मोठ्या प्रमाणावर मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना वाढत आहेत. जंगल संपत्तीवर आपल्या स्वार्थासाठी हातोडा चालवत आहे. त्यामुळे वन्यप्राणी खाद्यासाठी किंवा पाण्यासाठी जंगल सोडून वस्तीत येत आहेत.

Web Title: Two cows died after falling into a farm well in Konal Tilariwadi