शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वीस हजार क्विंटल बियाणे पेरणीविना

By admin | Updated: July 21, 2014 23:20 IST

५० टक्क्यांचीच विक्री : उशिरा पेरणीने उत्पादन घटणार

नितीन काळेल - सातारापावसाने दडी मारणे व त्याच्या उशिरा दाखल होण्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. त्याचबरोबर बियाण्यांवरही झालेला आहे. खरीप हंगामासाठी उपलब्ध केलेल्यांपैकी ५० टक्के बियाणे विक्री न झाल्याने पडून आहेत. त्यामुळे सुमारे वीस हजार क्विंटल बियाण्यांना यंदा अंकुर फुटणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच उशिरा पेरणी झाली तर उत्पादन घटणार आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी सर्व प्रकारचे मिळून ५१ हजार ७३० क्विंटल बियाणे लागणार होते. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आदी बियाण्यांचा समावेश आहे. त्याप्रकारे कृषी विभागाने नियोजनही केले होते. नियोजनाच्या तुलनेत जिल्ह्यात सुमारे ४० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. त्यापैकी १९ हजार ४३७ क्विंटल बियाण्यांचीच विक्री झालेली आहे. म्हणजे, उपलब्ध झालेल्या बियाण्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक बियाणे हे कृषी सेवा केंद्रात पडून आहेत. आता तर दुष्काळी भागात पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राहिलेले बियाणे विक्रीला जाणारच नाहीत. फक्त पश्चिम भागातच बियाण्यांना मागणी राहणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील कृषी केंद्र चालकांना शिल्लक राहणाऱ्या बियाण्यांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.एकंदरीत पावसाने दडी मारल्याने पूर्वेकडील भागात दुष्काळाचे सावट तीव्र होताना दिसत आहे. पश्चिम भागात उशिरा पेरणी सुरू झाली असली तरी येथील लोकांना धान्य पदरी पडण्याची आशा आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले. त्यातच या महिन्याअखेरपर्यंत चांगला पाऊस पडला तरच दुष्काळी भागात पेरण्या होणार आहेत. पाऊस नाही झाला तर खरीप हंगाम वाया जाणार आहे. पाऊस होऊन उशिरा पेरण्या झाल्या तर उत्पादनात घट होणार आहे. (उत्तरार्ध)