शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: ओव्हरटेकच्या नादात ट्रकला पाठिमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:37 IST

मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ येथील अपघातात तरुण ठार

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात चिरेवाहू ट्रकला पाठिमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अमन गणी खतिब (२२, रा. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात हुंबरठ तिठा येथे आज, बुधवारी (दि.३१) सकाळच्या सुमारास झाला.अमन खतिब हा कामानिमित्त राजापूर येथून दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीतील काम आटपून तो पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. हुंबरठ तिठा दरम्यान महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या दिशेने जात असलेल्या चिरेवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याचा नादात ट्रकला पाठिमागून जोरदार धडक दिली. या धडकेत अमन याच्या डोक्याला व अन्य ठिकाणी गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्य करत अमन याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, कुटुंबीय काही वेळानंतर उपजिल्हा रुग्णालय दाखल झाले. मात्र, अपघातात अमनचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. अमन याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Overtaking Attempt Turns Fatal; Biker Dies in Truck Collision

Web Summary : A 22-year-old biker died in Sindhudurg after his motorcycle collided with a truck while attempting to overtake. The accident occurred near Humbharth Titha when the victim, Aman Khatib, was returning home. He sustained fatal head injuries and died on the spot. Police are investigating.