शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण टाकेवाडी येथे ट्रॅव्हल्स उलटून १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 16:40 IST

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण टाकेवाडी येथे एका अवघड वळणावर मुंबई-विरार येथून सुटलेली व आचरा मालवण येथे जाणारी रामेश्वर ट्रॅव्हल्स (बस क्र. एम. एच. ०४, जीपी ८०८५) ही गाडी शनिवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या अपघातात एकूण १२ प्रवासी जखमी झाले असून गाडीचा चालक व क्लिनर फरार झाले आहेत.

ठळक मुद्देजखमी प्रवाशांवर आरोग्य केंद्रात उपचारखारेपाटण ग्रामस्थांनी घेतली घटनास्थळी धाव अपघातग्रस्तांना केली खासगी रुग्णवाहिकांनीही मदत

खारेपाटण ,दि. ०४ : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण टाकेवाडी येथे एका अवघड वळणावर मुंबई-विरार येथून सुटलेली व आचरा मालवण येथे जाणारी रामेश्वर ट्रॅव्हल्स (बस क्र. एम. एच. ०४, जीपी ८०८५) ही गाडी शनिवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या दरम्यान चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅव्हल्स गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या अपघातात एकूण १२ प्रवासी जखमी झाले असून गाडीचा चालक व क्लिनर फरार झाले आहेत.याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई-विरार येथून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता सुटलेली रामेश्वर ट्रॅव्हल्सची गाडी नेहमीच्या चालकाने न घेऊन जाता आपल्या ओळखीच्या विश्वासू दुसऱ्या चालकाकडे देऊन आचरा येथे घेऊन जायला सांगितले होते. मात्र शनिवारी पहाटे खारेपाटण टाकेवाडी येथे गाडी आली असता अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती डाव्या बाजूला उलटली.अपघाताचे वृत्त खारेपाटणमध्ये पसरताच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. खारेपाटण प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी जखमी प्रवाशांवर उपचार केले तर अपघातातील गंभीर दोन जखमी प्रवाशांना कणकवली येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.जखमी झालेले प्रवाशीमनाली सुनील अपराज (२२, आचरा-मालवण), जयप्रकाश श्रीधर म्हापणकर (५८, आचरा-मालवण), नीलिमा नारायण गुरव (४५, मणचे- देवगड), नारायण बाबाजी गुरव (४९, मणचे-देवगड), पुंडलिक धोंडू सावंत (५५, चिंदर कोंडवाडी), पल्लवी बापू परब (३५, श्रावण-मालवण), लावण्य बापू परब (६, श्रावण-मालवण), नीतेश मिलिंद कणकवलीकर (१८), मनीषा कणकवलीकर (५०, कणकवली), माया कळसुलकर (५६, कणकवली), जुई सुनील अपराज (२१, आचरा-मालवण), आजीज गौस कुणकेरकर (२२, नांदगाव तिठा)जखमी झालेल्या या १२ प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यापैकी मनाली सुनील अपराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तसेच पुंडलिक धोंडू सावंत यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.अपघाताचे वृत्त समजताच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या १०८ च्या रुग्णवाहिका देवगड, वैभववाडी, कासार्डे येथून घटनास्थळी दाखल झाल्या. तर नरेंद्र महाराज संस्थान नाणीज व गाडगीळ यांच्या खासगी रुग्णवाहिकांनीही जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यास मदत केली.खारेपाटण पोलीस स्थानकाचे हवालदार पी. जे. राऊत, एस. बी. कांबळी यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली व राजापूर पोलीस स्थानकाचे हवालदार ललीत देऊसकर, योगेश तेंडुलकर, प्रफुल्ल वाघमारे, योगेश भातडे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची पंचयादी घातली.लक्झरी गाडीचा चालक फरार असल्याने गाडीचे मालक तुकाराम सावंत (रा. वळीवंडे, देवगड) यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती देण्यात आली. ही गाडी नवीन असल्याचे समजते. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतचा अधिक तपास राजापूर पोलीस स्थानकाचे पोलीस करीत आहेत.याचठिकाणी दोन वेळा अपघात

हा अपघात झाला तेव्हा सर्व प्रवासी साखरझोपेत होते. कुणालाच काय झाले हे समजत नव्हते. सुमारे १५ फूट लांब फरफटत उलटी झालेली गाडी गेल्यामुळे क्लिनरच्या बाजूचे प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले. यापूवीर्ही याच ठिकाणी दोनवेळा लक्झरी गाडी उलटल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. 

टॅग्स :konkanकोकणAccidentअपघात