प्रशिक्षित हत्ती माघारी

By Admin | Updated: February 18, 2015 00:46 IST2015-02-18T00:46:48+5:302015-02-18T00:46:48+5:30

निरोपासाठी गर्दी : उपकार केल्याची ग्रामस्थांची भावना

Trained Elephant Returns | प्रशिक्षित हत्ती माघारी

प्रशिक्षित हत्ती माघारी

माणगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या तिन्ही रानटी हत्तींना जेरबंद करण्यासाठी कर्नाटक -म्हैसूरवरून आलेले अर्जुन, अभिमन्यू, गजेंद्र व हर्ष हे चारही प्रशिक्षित हत्ती मोहीम यशस्वी करून मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास माघारी परतले. त्यांना निरोप देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. अनेकांनी नारळ व केळी या हत्तींना खाण्यास दिली. परतीच्या प्रवासाला निघालेल्या या चारही प्रशिक्षित हत्तींनी जणू आपल्यावर फार मोठे उपकार केल्याची भावना ग्रामस्थांमध्ये होती. परतीला जाण्यापूर्वी अभिमन्यू या हत्तीने रानटी हत्तींची आपल्या खास शैलीत भेट घेतली. त्याच्यावर त्याने पाण्याचा फवाराही उडविला. हे दृश्य उपस्थित सर्व ग्रामस्थ आपल्या डोळ्यात साठवत होते. तर काहीजणांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्येही टिपला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Trained Elephant Returns