आंबोलीत सेल्फी काढताना पडून पर्यटक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 22:37 IST2017-08-02T22:37:03+5:302017-08-02T22:37:03+5:30

आंबोलीत सेल्फी काढताना पडून पर्यटक जखमी
आंबोली, दि. 2 - आंबोली मुख्य धबधब्यावर सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पडल्याने कुणाल अशोक फडतरे (३४, रा. सोलापूर-दमनीनगर, देगानाका रोड) हा युवक जखमी झाला. बुधवारी दुपारी १ वाजण्याचा सुमारास ही घटना घडली.
सोलापूर येथील कुणाल फडतरे, निरंजन चंदनशिवे, प्रकाश लगशेट्टी, नितीन घुमरे आदी युवक स्वीफ्ट डिझायर कारने गोवा येथे पर्यटनाला जात होते. वाटेत ते आंबोली धबधब्यावर पर्यटनासाठी थांबले. यातील अशोक हा सेल्फी काढण्याच्या नादात दगडावरून घसरून पडला. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली.
तेथील काही पर्यटकांनी लगेचच १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. सुरजित पांडव आणि डॉ. अदिती पाटकर यांनी त्याच्यावर उपचार केले. अधिक उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले. याबाबत आंबोली पोलीस तपास करीत आहेत.