शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

हुतात्मा स्मारक होणार पर्यटन केंद्र!

By admin | Updated: January 15, 2015 23:32 IST

गोवा मुख्यमंत्र्यांची माहिती : ‘पत्रादेवी’चा होणार विकास; दोन टप्प्यांमध्ये होणार सुशोभीकरण

नीलेश मोरजकर - बांदा - गोवा स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान दिलेल्या सत्याग्रहींच्या स्मरणार्थ महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर पत्रादेवी येथे उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचा ‘पिकनिक पॉर्इंट’ अंतर्गत विकास करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक स्थळाचे दोन टप्प्यांमध्ये सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केल्याने याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम गोवा मुक्ती दिनाच्यापूर्वी १९ डिसेंबर २0१५ पर्यंत करण्यात येणार आहे.पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना या स्मारकाचा इतिहास समजावा या दृष्टिकोनातून या स्मारकाचा विकास करण्याचा गोवा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मारकाच्या पिकनिक पॉर्इंटचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय जागेचा विस्तार करून त्यामध्ये ऐतिहासिक टप्पे निर्माण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास व ज्यांनी या लढ्यासाठी बलिदान दिले त्याची माहिती देण्यात येणार आहे.गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बारा वर्षांपूर्वी या स्थळाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून विकास करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. या स्मारकाविषयी सीमावासीयांच्या मनात असलेल्या भावनांचा आदर राखून विकास करण्याचे निश्चित केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.असा आहे पिकनिक पॉर्इंट हुतात्मा स्मारक परिसरात या प्रकल्पासाठी ८0 हजार घनमीटर जागा शासनाने राखून ठेवली आहे. या ठिकाणी विविध ऐतिहासिक टप्पे निर्माण करण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे. स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख ऐतिहासिक देखावे दाखविणारे सहा प्रमुख प्रसंग उभारण्यात येणार आहेत.प्रत्येक ठिकाणी या प्रसंगाशी निगडित दृश्ये, भित्तीचित्रे, लेणी दर्शविण्यात येणार आहेत.ऐेतिहासिक विभागातील पहिल्या स्पॉटवर नियतकालिके, पुस्तिका यांच्या साहाय्याने स्वातंत्र्य चळवळीविषयी जनजागृती निर्माण करणे, खादीचा पुरस्कार, पोर्तुगीज सरकारच्या कार्यक्रमांवर बहिष्कार यांचा समावेश आहे. सत्याग्रह या दुसऱ्या स्पॉटवर सत्याग्रह, आंदोलने व राम मनोहर लोहियांसारख्या प्रमुख व्यक्तींना अटक, सभा, गोवा विमोचन समिती इत्यादी बाबी तर स्पॉट क्रमांक तीनवर पत्रादेवी येथे स्वातंत्रसैनिकांचा मृत्यू आणि या ठिकाणी अनेकांना झालेली अटक, याची माहिती देण्यात येणार आहे.स्पॉट क्रमांक चारवर निर्घृण हत्या व अत्याचार, अनेकांना झालेली अटक, त्यांचा छळ व तुरुंगात झालेला मृत्यू, स्पॉट पाचवर त्यानंतरचे राजनैतिक प्रयत्न व विविध माध्यमांमुळे संग्रामाची आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी व शेवटच्या स्पॉटवर गोवामुक्ती आणि विशेषत: ‘आॅपरेशन विजय'चे सचित्र दर्शन होणार आहे. या ऐतिहासिक टप्प्याबरोबरच या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षांच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. भव्य पटांगण, ९00 घनमीटर जागा व्यापलेला प्रचंड तंबू मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याशिवाय पक्षी निरीक्षणासाठी साहित्य, अडथळा शर्यत, झुलता पूल, जंगलवाटा, जलक्रीडा, जंगल भ्रमंती यांचा आनंदही घेता येणार आहे. विविध कार्यक्रमांसाठी खुला रंगमंच, व्यवस्थापक कार्यालय, स्त्रिया व पुरुषांसाठी प्रसाधनगृहे, नौकानयनासाठी धक्का अशा अनेक सुविधांचा या पिकनिक पॉर्इंटमध्ये समावेश आहे.गोवा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. आजही विविध भागातून पर्यटक याठिकाणी येतात. ‘पिकनिक स्पॉट’ पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांत वाढ होऊन ते एक विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे. गोवा मुक्तीसाठी ज्या विरांनी हौतात्म्य पत्करले, त्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी या प्रकल्पाचे काम हे लवकरात लवकर सुरू होणे हे गरजेचे आहे.हुतात्मा स्मारकाविषयी...साडेचारशे वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या मगरमिठीत होता. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही तब्बल चौदा वर्षे गोवा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच खऱ्या अर्थाने गोवा मुक्ती उठावास सुरुवात झाली. गोवा स्वातंत्र्य होण्यासाठी कित्येक आंदोलने झालीत. त्यानंतर गोवा मुक्ती लढ्यात ३१ सत्याग्रही शहीद झाले आहेत. त्यापूर्वी सामुदायिक सत्याग्रह १९५४ साली झाला. या लढ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार, तमिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश या राज्यांतील सत्याग्रही शहीद झाले. गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतातील विविध राज्यांतील तसेच शेजारील सिंधुदुर्गातील सत्याग्रही शेकडोंच्या संख्येने शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ गोवा शासनाने पत्रादेवी येथे भव्य असे हुतात्मा स्मारक उभारले आहे.पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. येथील पर्यटकांमुळे व्यापारवृद्धीही होणार आहे.