शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

‘जीपीआर गॅलॅक्सी’ करणार माजी विद्यार्थी एकत्र

By admin | Updated: April 28, 2015 00:20 IST

शासकीय तंत्रनिकेतन : १९६१ नंतर बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष निमंत्रण

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजशी ऋणानुबंध कायम ठेवून या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने ‘जीपीआर गॅलॅक्सी’ ग्रुप तयार केला आहे. या विद्यार्थ्यांच्या वेबसाईटचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. आता या वेबसाईटच्या माध्यमातून १९६१ नंतर या कॉलेजमधून बाहेर पडलेल्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा मानस या ग्रुपने व्यक्त केला. शासकीय तंत्रनिकेतनमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या कॉलेजसाठी, येथील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला हवे, या तळमळीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी ‘जीपीआर गॅलॅक्सी’ नावाने बेवसाईट तयार केली आहे. या वेबसाईटचे अनावरण शनिवारी थिबा पॅलेस येथील कॉलेजच्या आवारात झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. आर. केरकल, तर प्रमुख अतिथी माजी प्राचार्य व्ही. एस. टेंबे होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राध्यापक व्ही. एस. तलाठी आणि बी. ए. लवलेकर तसेच या कॉलेजचे माजी विद्यार्थी, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष संजू साळवी, विवेक नार्वेकर, रामू पाटील उपस्थित होते.हा कार्यक्रम सर्वांच्या शीरपेचात तुरा खोवणारा आहे, असे प्रा. टेंबे यांनी सांगितले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तयार केलेल्या वेबसाईटचे अनावरण होत आहे, हा दिवस सुवर्णाअक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे, असे उद्गार त्यांनी काढले. लवलेकर, तलाठी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात केरकल यांनी सोशल मीडियाचा उपयोग विधायक कार्याकरिता कसा होऊ शकतो, याची मार्मिक उदाहरणे दिली. माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारातच असे विविध उपक्रम राबवल्यास कॉलेजशी अ‍ॅटॅचमेंट वाढेल, असे ते म्हणाले. लक्ष्य समोर ठेवा, आपोआप उद्दिष्टपूर्ती होत जाते, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काही प्रमुख सूचनाही केल्या.या बेबसाईटच्या मदतीने विविध भागात असलेले इतरही माजी विद्यार्थी एकत्र आल्यास दरवर्षी गरजू मुलांचा खर्च उचलणे, शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना नोकरी उपलब्ध करून देणे, कॉलेजच्या समस्या सोडविणे शक्य होणार आहे. वेबसाईटची माहिती जीपीआर गॅलॅक्सीयन आशुतोष कवळे आणि सीमा केळकर यांनी सूत्रसंचालनातून दिली.वेबसाईटच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, या ग्रुपचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले. नितीन कानविंदे यांनी आभार मानले. या क्षेत्रातील अजोड व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला केरकल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात गॅलेक्सीने पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)पंधरा मिनिटांची शब्दांजली...दोन मिनिटांच्या स्तब्धतेने श्रद्धांजली अर्पण केली जाते. मात्र, जीपीआर गॅलॅक्सीयन्सनी अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली मैत्रिण रंजना लिमये (श्रेया मुळ्ये) हिला भावनोत्कट पद्धतीने पंधरा मिनिटांची ‘शब्दांजली’ अर्पण केली. आशुतोष कवळे यांच्या निवेदनासोबतच तिच्या विविध फोटोंची क्लिप आणि या अतिशय भावनिक वातावरणात भर घालणारे ‘बहती हवा सा था वो’ हे अभिनेता आमीर खान याच्यावर चित्रीत केलेले गाणे या भारलेल्या वातावरणाने सर्व माजी विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू उभे केले. यावेळी रंजना लिमये - मुळ्ये यांच्या मुलांना शिक्षणासाठी या ग्रुपतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला.