शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून ‘श्रीं’चा जागर

By admin | Updated: August 28, 2014 23:14 IST

लाखो भक्तगण दाखल : भजनांनी रात्री जागणार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या, शुक्रवारी ६४ हजार घरगुती, तर ३४ सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे श्री गणेशमूर्तींचे विधीवत पूजन करण्यात येणार आहे. उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज, गुरुवारी काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत श्री गणेशमूर्ती आणण्यात आल्या. त्यातच सोमवारपासून तीन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसाने आज काहीशी विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला.कोकणात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आणि घरोघरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला आज, शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात प्रारंभ होणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने घराघरांत लगबग सुरू आहे. कोकण रेल्वे, एसटी, खासगी बसेस तसेच खासगी वाहनांनी सिंधुदुर्गात अनेक भाविक दाखल झाले आहेत. यात मुंबईतील चाकरमान्यांचा मोठा सहभाग आहे.दरम्यान, आज सर्वत्र घरोघरी हरितालिकेचे पूजन करण्यात आले. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा गजबजलेल्या होत्या. घरांना रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नोकरीधंद्यानिमित्त मुंबई, पुण्यासह वेगवेगळ््या भागात स्थायिक झालेले कोकणवासीय आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. एरवी बंद असलेली घरे गणेशोत्सवाच्या निमित्ताने उघडण्यात आली आहेत. भजनांचे सूर दुमदुमणारगणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील घराघरांत उत्सव कालावधीत म्हणजे पुढील ११ दिवस आरती आणि भजनांचे सूर दुमदुमणार आहेत. रात्री जागविल्या जाणार असून, मुुंबईवरून आलेले चाकरमानी आणि येथील ग्रामस्थ मंडळी एकत्रितरीत्या भजनांमध्ये सामील होणार आहेत.