शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बंदमुळे स्थानकांतील दुकानदारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:13 IST

CoronaVIrus Kankavli Sindhudurg : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवासीच नसल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बसस्थानकांतील परवानाधारकांना पुन्हा आपापली दुकाने बंद ठेवणे भाग पडले आहे. त्यामुळे या दुकानदारांची होरपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देएसटी बंदमुळे स्थानकांतील दुकानदारांवर उपासमारीची वेळ कुटुंबांसह नोकरवर्गाची होरपळ : करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान

कणकवली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवासीच नसल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बसस्थानकांतील परवानाधारकांना पुन्हा आपापली दुकाने बंद ठेवणे भाग पडले आहे. त्यामुळे या दुकानदारांची होरपळ सुरू झाली आहे.या दुकानदारांच्या कुटुंबासह नोकरदार वर्गांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी वर्षाचे ३६५ दिवस आणि स्थानकांमध्ये दैनंदिन १४ ते २४ तास राबणाऱ्या या परवानाधारक दुकानदारांचे पहिल्या पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.२१ ऑगस्टपासून एसटीची प्रवासी सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू झाली होती. त्यामुळे काहींनी आपली दुकाने कशी-बशी सुरू केली, तर काहींना ती सुरू करणे परवडणारे नसल्याने बंद ठेवणे भाग पडले. डिसेंबरच्या दरम्यान प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागल्याने सर्वच दुकानदारांनी आपापली दुकाने सुरू केली.

परवानाधारक दुकानदार थोडेसे आर्थिकदृष्ट्या सावरत असताना, दुसऱ्या लॉकडाऊनमुळे राज्यातील एसटी प्रवासी सेवाच बंद झाली. त्यामुळे स्थानकांतील सर्वच दुकाने बंद झाली आहेत. शासनामार्फत या सर्वांना कोणतेच लाभ मिळत नसल्याने दुकानदारांसह नोकरदार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.परवानाधारकांना मदत करावी : भाई चव्हाणप्रवासी सेवा बजावत असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांसह काही स्थानकांतील परवानाधारक दुकानदारांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातून काही बरे झाले, पण काही जणांचे निधन झाले. या संसर्गाची झळ त्यांच्या कुटुंबीयांना बसली आहे. त्यांच्या घरातील काही ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाले आहे.

मात्र, शासन स्तरावर याची कोणीच दखल घेत नाही, अशी खंत एसटी कॅन्टीन व स्टॉलधारक परवानाधारक असोसिएशनचे अध्यक्ष राम हरल, उपाध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी व्यक्त केली आहे, तसेच या परवानाधारक दुकानदारांना शासनाने मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग