शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली, नितेश राणेंचा इशारा

By सुधीर राणे | Updated: May 12, 2023 14:11 IST

उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

कणकवली: संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते पुन्हा तुरुंगामध्ये जातील. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. कणकवली येथे आज, शुक्रवारी नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत आणि अनिल देसाईंमुळे उद्धव ठाकरे संपले आहेत. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झाले हे प्रथम सांगावे ? राऊतांना अक्कलदाढ अजून आलेली नाही. संजय राऊत हे घाबरले आहेत.कालच्या न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकार अजून भक्कम झाले आहे. संजय राऊत यांचे तुरुंगामध्ये जाण्याचे दिवस पुन्हा येणार आहेत.  तुरुंगामध्ये असताना बाथरूमसाठी अन्य कैद्यांबरोबर ते भांडत असत. इतर कैद्यांनी जेलरकडे याची तक्रार केली होती. पत्राचाळ मधल्या मराठी माणसाचा शाप त्यांना लागणार आहे. त्यामुळे आताच त्यांनी बॅग भरून ठेवावी असेही ते म्हणाले.मग आमदारकीचा राजीनामा का दिला नाही?नैतिकतेच्या कारणामुळे मी राजीनामा दिला असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आता नैतिकतेची भाषा करतायत, मला त्यांना विचारायचे आहे की, शिवसेना अधिकृत ही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.' उबाठा' हे नाव त्यांना तात्पुरत दिले होते. त्यामुळे त्यांना वेगळे नाव आणि चिन्ह निवडावेच लागेल. राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाईव्ह केले त्याची उद्धव ठाकरेंना मी  आठवण करून देईन, मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा देतो असे त्यावेळी म्हणाला होतात. मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिलेला नाही? तुमच्यात खरच नैतिकता असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. २०१४ ते २०१९ चा काळ आठवा. उद्धव ठाकरे सख्ख्या भावाची तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे ते न्यायालयात जाऊन बघा. लालूंच्या मुलाला नतमस्तक व्हायला लावायला हवं होतंनितीशकुमार यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावर राणे म्हणाले, 'काल नितीशकुमार यांच्याबरोबर लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आलेला होता. ज्या लालूंनी संधी मिळेल तिथे बाळासाहेबांचा अपमान केला होता. हिंदुत्वाचा अपमान केला होता. तुमच्यात हिंमत असती तर नितीशकुमार आणि लालूंच्या मुलाला बाळासाहेबांच्या खोलीत घेऊन जायला हवे होते, तिथे नतमस्तक व्हायला लावायला हवं होतं. पण तसे झाले नाही. जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार? संजय राऊत हे ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतावर खासदार झाले आहेत, त्याचा त्यांनी पहिला राजीनामा द्यावा. मग बघू त्यांची नैतिकता. जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार?  तेव्हा बाळासाहेबांनी खासदारकी दिली नाही म्हणून ६ जून १९९८ ला  बाळासाहेबांवर एका साप्ताहिकात लेख लिहिला होता. त्यात त्यांनी काय लिहिले आहे? ते जनतेला माहिती आहे असा हल्लाबोलही नितेश राणेंनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSanjay Rautसंजय राऊतNitesh Raneनीतेश राणे