शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग तिलारी मार्गावर आंबेली नजीक कार अपघात एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:10 IST

चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून हा अपघात झाला

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी मुख्य राज्यमार्ग आंबेली कोनाळकरवाडी येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कारला झालेल्या अपघातात साटेली येथील युवक गंभीर जखमी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून हा अपघात झाला. यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातात जखमी झालेला युवक आपल्या कारने दोडामार्ग ते साटेली-भेडशी असा प्रवास करीत होता. कारमध्ये तो एकटाच होता. दरम्यान आंबेली कोनाळकरवाडी येथे आला असता कारवरील त्याचा ताबा सुटला व कार थेट जाऊन झाडाला आदळली. त्याच्या मागून असलेल्या गाडीतील युवकांनी आपली गाडी थांबवली. ते दृश्य पाहिले खरे परंतु रस्त्याच्या बाहेर गेलेली अपघात ग्रस्त कार उचलून चालकाला बाहेर काढणे त्यांना शक्य नव्हते. 

कार पूर्णतः कलांडली होती. एका काजूच्या झाडाला कारची पाठीमागची बाजू अडकल्याने कार पलटी झाली नाही. परंतु, कार मधील युवकाचे डोके व हात दरवाजातून बाहेर आले होते. त्याच्या नाकातून , कानातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता. घटनेबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांना ही बातमी समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

पोलीस व जमलेल्या युवकांच्या साहायाने कार मधील जखमी युवकाला बाहेर काढून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात खासगी वाहनाने दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला गोवा बांबूळी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दोडामार्ग रुग्णालयातून देण्यात आली. हा युवक साटेली-भेडशी येथील आहे.घटनास्थळावरून बाबुराव धुरी यांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला परंतु रुग्णवाहिका वेळेत न पोचल्याने बाबुराव धुरी यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात