हॉटेल परिसरातून कोल्हापूरच्या तीन मुली ताब्यात

By Admin | Updated: January 18, 2015 00:37 IST2015-01-18T00:35:22+5:302015-01-18T00:37:34+5:30

सावंतवाडीतील घटना : ठेकेदाराची चौकशी?

Three girls from Kolhapur were arrested from the hotel premises | हॉटेल परिसरातून कोल्हापूरच्या तीन मुली ताब्यात

हॉटेल परिसरातून कोल्हापूरच्या तीन मुली ताब्यात

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरातील एका हॉटेल परिसरातून पोलिसांनी तीन मुलींना ताब्यात घेतले. या तिन्ही मुली कोल्हापूर परिसरातील असून, पोलीस उशिरापर्यंत या तिन्ही मुलींची चौकशी करीत होते. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना विचारले असता, पोलिसांना गाडीत दारू असल्याचा संशय आल्यानेच त्यांची चौकशी केल्याचे स्पष्ट केले. मात्र, शहरातील एक ठेकेदार याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने कार घेऊन जात असताना सावंतवाडीत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये तीन मुली व त्यांच्यासोबत चालक त्या हॉटेलात जेवत असतानाच सावंतवाडी पोलिसांचे एक पथक त्या हॉटेलात गेले आणि त्या तीन मुलींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्या मुलींची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी त्या कारमधील तीन मुलींची चौकशी केली, पण त्यांच्या कारमध्ये दारू आढळून आली नाही, असे सांगितले. दरम्यान, हॉटेलमधून ताब्यात घेतलेल्या या मुली सावंतवाडीत का आल्या, त्यांना कोणी बोलावले याची चर्चा सुरू आहे. नामांकीत ठेकेदाराचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? याबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Three girls from Kolhapur were arrested from the hotel premises