साडेतीन वर्षाच्या बालकाचा ओहोळात बुडून मृत्यू

By Admin | Updated: June 13, 2017 13:30 IST2017-06-13T13:30:09+5:302017-06-13T13:30:09+5:30

नजर चुकवून गेल्या पाण्यात

Three and a half year old child drowning | साडेतीन वर्षाच्या बालकाचा ओहोळात बुडून मृत्यू

साडेतीन वर्षाच्या बालकाचा ओहोळात बुडून मृत्यू

आॅनलाईन लोकमत

वैभववाडी, दि. १३ : कणकवली तालुक्यातील तिथवली येथे ओहोळात बुडून साडेतीन वर्षाच्या बालकाचा मंगळवारी मृत्यू झाला. अल्फाज शोएब शेख असे या बालकाचे नाव आहे.


मंगळवारी दुपारी १२. ३0 वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे शेख कुटूंबिय गेल्या पाच वर्षापासून तिथवली गावात राहतात. सिमेंटच्या वस्तू बनविणाऱ्या कारखान्यात ते कुटूंब काम करते.


मंगळवारी दुपारी आईची नजर चुकवून अल्फाज जवळच्याच ओहोळात गेला. परंतु पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैभववाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून मृतदेह त्याच्या कुटूंबियाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title: Three and a half year old child drowning