शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिकारीचे पुरावे नाहीत

By admin | Updated: January 29, 2015 23:38 IST

मळेवाड येथील प्रकरण : ‘लोकमत’च्या वृत्ताने शिकाऱ्यांचे धाबे दणाणले

मळेवाड : मळेवाड हळदीचे भोम येथे वन्यप्राण्यांची शिकार या वृत्ताने जाग आलेल्या वनविभागाने दोन दिवस येथील जंगल परिसर अक्षरश: पिंजून काढला. मात्र, प्राण्यांच्या केसाव्यतिरिक्त त्यांना आणखी कोणताही पुरावा सापडलेला नाही.वन्यप्राण्यांची शिकार करुन त्यांच्या मांसाची तस्करी केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर इतके दिवस निद्रावस्थेत असलेल्या वनविभागालाही जाग आली. शिकारी होत असल्याच्या वृत्तामुळेच आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक कुमार खराडे, वनमजूर चंद्रकांत तावडे आदींनी हळदीचे भोम या परिसरात काही पुरावे सापडतात का, याचा शोध घेण्यासाठी हा जंगलमय परिसर पुर्णपणे पिंजून काढला. मात्र, काही ठिकाणी वन्य प्राण्यांचे केस पडलेले मिळाले. त्याव्यतिरिक्त काहीही हाती लागले नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शिकाऱ्यांनीच वन अधिकारी पोहोचण्याच्या आधी उरलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जंगलात शिकारीसाठी फिरणारे हे सराईत शिकारी आहेत. मात्र, शिकारीचा घडलेला प्रकार आणि त्यानंतर वनविभागाने जंगल परिसरात सुरु ठेवलेली गस्त यामुळे शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या परिसरातील शिकारीला काही प्रमाणात आळा बसणार असल्याने या परिसरातील प्राणीमित्रांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)गावात चर्चागावात चर्चाहळदीचे भोम या परिसरात दोन दिवस फिरल्यानंतरही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शिकारीबाबतचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. मांसाची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणी काही केस आढळून आले. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गस्तीनंंतरही शिकारी कशा होतात, याचेच आश्चर्य वाटत आहे. वनाधिकाऱ्यांनी शिकारीनंतर मांस व अन्य मुद्देमाल जाळलेल्या जमीन मालकाचा जबाबही नोंदवून घेतला. दोन दिवस या जंगलात वन अधिकाऱ्यांची फिरती असल्यानंतरही बुधवारी रात्रीही सुमारे साडेनऊच्या दरम्यान या जंगलात बॅटरीच्या प्रकाशाचे झोत दिसून येत होते. मळेवाड गोवा रस्त्यापासून काही अंतरावरच प्रकाश दिसत असल्याने यामागे शिकारीच जंगलात फिरत असल्याची चर्चा नाक्यावर रंगलेली होती.