शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हा तर आदित्य ठाकरेंचा पोरकटपणा, दीपक केसरकर यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:32 IST

दिवस-रात्र मुंबई महापालिकेच्या पैशावर जगणारी माणसे

सावंतवाडी : विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून शिक्षण खात्याबद्दल बोलणे माझ्या बद्दल बोलणे हा आदित्य ठाकरेंचा पोरकटपणा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. दिवसरात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोकं आहेत. मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचा दाखवा, असे आव्हान माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी उद्धवसेनेला दिले आहे, तसेच माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी, माझ्या तत्त्वांशी आहे. मी स्वतःहून कोणाच्याही अंगावर जात नाही अन् कोणी अंगावर आले तर सोडत नाही. त्यामुळे विनाकारण भानगडीत पडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.ते बुधवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केसरकर म्हणाले, यापूर्वी फक्त मागास विद्यार्थांना सोडून इतरांना गणवेश दिला जात नव्हता. ते सर्व विद्यार्थ्यांना मी मंत्री असताना द्यायला लावले. पुस्तकांचा बोजा कमी केला, नवीन प्रयोग करताना काही त्रुटी राहू शकतात. चांगल्या दर्जाचा कपडा मुलांना दिला जात नव्हता. माझ्या काळात ते दिले गेले.मी उद्धव ठाकरे यांचा आजवर आदर केला; पण ज्यावेळी मी बोलायला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.अशा फालतू घोषणांना तिथल्या तिथे उत्तर देऊ शकलो असतो; पण ठाकरे घराण्याचा कमीपणा झाला असता. याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा करणार होतो. ही एक चांगली योजना आहे. शिक्षण खात्यात मी चांगले काम केले. मराठीला न्याय दिला आहे. राज ठाकरे नेहमी मराठीसाठी भांडतात. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा ते चालवत आहेत.राणेंशी माझा वैयक्तिक वाद नव्हतादरम्यान, ठाकरे कुटुंबीयांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हते. राहायला जागा देत नव्हते, एवढा दरारा नारायण राणेंचा होता. बाळासाहेबांचा मुंबईत दारारा होता; पण इथून गोव्यात जावे लागत होते. जिल्ह्यात हे आले नाही, मी लढा दिला; पण त्यांनी युज ॲड थ्रो केले. राणेंशी माझा वैयक्तिक वाद नव्हता, असेही केसरकर म्हणाले.