शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कलमठ येथे चोरट्यानी बंद बंगला फोडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 15:17 IST

kankvali, crimenews, police, sindhudurng कणकवली शहरालगतच्या कलमठ गजानन नगर भागातील एक बंद बंगला चोरट्यांनी फोडला आहे . गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला . या बंगल्यातून सुमारे ४० हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली असून पोलिसांनी चौघा संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे .

ठळक मुद्देकलमठ येथे चोरट्यानी बंद बंगला फोडला !सुमारे ४० हजाराची रोकड लंपास ; चौघे संशयित ताब्यात

कणकवली : कणकवली शहरालगतच्या कलमठ गजानन नगर भागातील एक बंद बंगला चोरट्यांनी फोडला आहे . गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला . या बंगल्यातून सुमारे ४० हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली असून पोलिसांनी चौघा संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे .कणकवली शहर आणि लगतच्या कलमठ गावात दहा दिवसापूर्वीही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या . त्यानंतर गुरुवारी पुन्हा कलमठ येथे बंगला फोडल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे .कलमठ गजानन नगर येथे करूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण सदाशिव नारकर यांचा बंगला आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन कालावधीत ते कुटुंबासह करंजे येथील आपल्या मूळ गावी राहण्यास गेले होते. गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी बंगल्याकडे आली असता समोरील दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. तिने घरात जाऊन पाहिले असता कपाटातील कपडे तसेच इतर साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले होते. तसेच कपाटातील चाळीस हजाराची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.

त्यामुळे या घटनेबाबतची माहिती पत्नीने लक्ष्मण नारकर यांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलिसांना घटनेबाबत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ओरोस येथून ठसे तज्नाना तसेच श्वान पथकाला पाचारण केले. या श्वान पथकातील श्वान कलमठ येथील बिडयेवाडी येथे जाऊन घुटमळला.

तर नारकर यांच्या घरातील कपाटात असलेल्या मोबाईलच्या खोक्यावर काही ठसे मिळाले आहेत. त्या अनुशँगाणे पोलीसानी तपासाची सूत्रे फिरवली आहेत. या चोरीच्या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत करण्याची प्रक्रिया सुरू होती . या घटनेचा पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अधिक तपास करीत आहे.लवकरच धागेदोरे मिळतील !कलमठ चोरीप्रकरणात ताब्यात घेतलेल्या चार संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्या संशयितांचा या चोरीप्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास यापूर्वी झालेल्या चोऱ्यांचे धागेदोरेही निश्चितपणे मिळू शकतील. कारण सर्व घटनातील चोरी करण्याची पध्द्त समान आहे. असे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली