शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:38 IST

शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली.

 सावंतवाडी - शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली. यापुढे सावंतवाडी उद्योगात रोल मॉडेल असेल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच साळगावकरांच्या संकल्पनेतील विकास परिषद आपल्या अध्यक्षतेखाली होण्यासही मंत्री केसरकर यांनी हिरवा कंदिल दर्शविला आहे.

एका खासगी कार्यक्रमासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह नगराध्यक्ष बबन साळगावकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेल्या सत्तर वर्षात विकास झाला नाही. तो विकास आता होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन विकासाची दिशा ठरवूया, असे सांगितले. तसेच सावंतवाडीच्या बाहेरून रस्ता गेला म्हणजे सावंतवाडीतील धंदा कमी झाला असे होत नाही. आता नव्याने वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. ते प्रकल्प रोजगाराबरोबरच विकासाला दिशा देणारे ठरतील, अशी अपेक्षाही साळगावकर यांनी व्यक्त करत आम्ही विकास परिषद घेतो ती तुमच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी अपेक्षा व्यकत केली.यावेळी बोलतना मंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये रोजगाराचे एक नवे पर्व सुरू होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सावंतवाडीजवळ चष्म्याचा कारखाना तसेच डाटा सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. यातून थेट पाचशे महिलांना सावंतवाडीत रोजगार मिळेल. तर इतर ठिकाणी रोजगार मिळेल तो वेगळाच आहे. त्या शिवाय आपला आयएएस व आयएपीएस सेंटरही लवकरच मार्गी लागणार आहे. सिंधुदुर्गचा झपाट्याने विकास होत असताना चिपीमध्ये पहिले विमान १२ सप्टेंबरलाच येणार आहे. माल्टातून पहिले विमान चिपीला येईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग पर्यटनात अग्रेसर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.सावंतवाडी ही विकासाचे रोल मॉडेल करत असतानाच बाहेरून रस्ता गेला म्हणजे धंदा होत नाही असे नाही. मात्र आता ती मानसिकता सर्वांनी सोडून देऊन नवीन स्वीकारण्याची तयारी ठेवूया. रोजगारातून विकास साधूया, असे सांगत यापुढे सावंतवाडीतील शिल्पग्राम तसेच हेल्थ फार्म सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.  ७२ कोटीचा निधी मागे जाणार होतासिंधुदुर्गमध्ये मागील वर्षातील ७२ कोटीचा निधी मागे जाणार होता. पण तो मी दोन महिन्यांसाठी थांबवला आणि तो खर्ची पडत आहे. हे मी अर्थराज्य मंत्री असल्याने शक्य झाले, अन्यथा निधी मागे गेला असता. अधिकाºयांनीही आता चांगले काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गnewsबातम्या