शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गृहखात्याचा धाकच नाही मग सावंतवाडीसारखे प्रकार घडणारच, बाळासाहेब पाटील यांचे टीकास्त्र 

By अनंत खं.जाधव | Updated: October 13, 2023 12:35 IST

सावंतवाडी : संपूर्ण राज्यातच कायदा सुव्यवस्था ढासळली असल्यानेच कोणाचा धाक राहिला नसल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात जो प्रकार घडला तशीच ...

सावंतवाडी : संपूर्ण राज्यातच कायदा सुव्यवस्था ढासळली असल्यानेच कोणाचा धाक राहिला नसल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात जो प्रकार घडला तशीच परिस्थिती सर्वत्र आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गृहविभागावर टीकास्त्र सोडले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रविण भोसले, व्हिक्टर डॉन्टस, माजी मंत्री प्रविण भोसले, अर्चना घारे-परब प्रसाद रेगे, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, सरकाराला जनतेचे देणे घेणे राहिले नाही. रूग्णालयात एवढे मृत्यू होतात त्याबद्दल कोण बोलायला तयार नाहीत. अशी खंत व्यक्त करत एखादा विषय पुढे करायचा आणि त्यावर चर्चा घडवून आणायची ऐवढेच फक्त सुरू आहे. पण जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात सुप्त लाट आहे. ती नक्कीच निवडणुकीतून व्यक्त होईल.शरद पवार यांनी परतीचे दोर कधीच कापले 

राष्ट्रवादी काँग्रेस मधून जे फुटून गेले त्याच्या परतीचे दोर शरद पवार यांनी कधीच कापले आहेत त्यामुळेच त्यांना आता पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण आम्ही शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहोत त्यातील काही जणांना अजित पवार गट आमिषे दाखवत आहे. पण त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

अन्यथा तसे प्रकार सर्वत्र घडतील ज्या ठिकाणी पोलिसांची कंत्राटी पध्दतीने भरती होणार आहे. मग राज्यात कायदा सुव्यवस्था काय राहणार आहे. कोणाचा कुणावर धाक राहणार नाही हा निर्णय चूकीचा आहे. जनतेला न परवडणारा आहे. अन्यथा सावंतवाडीत जसा लाचलुचपतचा प्रकार घडला तसेच प्रकार सर्वत्र घडतील या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली.मी अहवाल देईन पण पक्षच निर्णय घेईलमाजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना सावंतवाडी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का असे विचारले असता मी माझा अहवाल पक्षाला देईन पण निर्णय हा वरिष्ठ नेतृत्व घेणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा सुरू झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेसBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलPoliceपोलिस