कणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:26 PM2020-01-23T12:26:43+5:302020-01-23T12:27:27+5:30

कणकवली शहरात पुन्हा एकदा धाडसी चोरीची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गलगत एस. एम. हायस्कुल शेजारील पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूमचे दर्शनी भागातील शटर अज्ञात चोरट्यानी उचकटून आत प्रवेश केला. तसेच शोरूम मधील कपडे व रोख रक्कमेसह १ लाख ८२ हजार ३५५ रूपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Theft in Peter England Cloth Show Room | कणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरी

कणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरी

Next
ठळक मुद्देकणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

कणकवली: कणकवली शहरात पुन्हा एकदा धाडसी चोरीची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गलगत एस. एम. हायस्कुल शेजारील पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूमचे दर्शनी भागातील शटर अज्ञात चोरट्यानी उचकटून आत प्रवेश केला. तसेच शोरूम मधील कपडे व रोख रक्कमेसह १ लाख ८२ हजार ३५५ रूपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान , या शोरूम जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.

एस एम हायस्कुलनजीक रात्री बंद करण्यात आलेल्या पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूमला चोरट्यानी
मंगळवार पहाटे ४ वाजण्याचा सुमारास लक्ष्य केले. शटर उचकटून काऊंटरमधील रोख रक्कमेसह कपडे आणि अन्य साहित्याची चोरी केली आहे. या शो रूम चे मालक संकेत नाईक, सुजित जाधव व अन्य नागरिकांनी घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना माहिती दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटदरे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना तपसाबाबत सूचना दिल्या.
ओरोस येथून श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञाना पाचारण करण्यात आले. शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे चोरी करताना कैद झाले आहेत. पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक शोरूमच्या आजूबाजूच्या इमारती व आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून काही सुराग मिळतो का? हे पहात आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बांगर करीत आहेत.

-- फोटो ओळ-- कणकवली येथिल पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममधून अज्ञात चोरट्यानी माल लंपास केला.

Web Title: Theft in Peter England Cloth Show Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.