सावंतवाडी : उद्धव शिवसेनेकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही ते फक्त आग लावायची आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचा उद्योग करत आहेत. काजू बागायतदार शेतकरी यांचा फलक लावण्यात आलेले आहे तो उद्धव शिवसेनेचे उद्योग आहेत असा आरोप शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केला. सावंतवाडीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.केसरकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे आहेत. ते एकट्या कुणाचे नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना केसरकर यांना लगावला. अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्रासाठी काही केले नाही. त्यामुळे खोटे नाटे आरोप करत आहेत. काजू बागायतदारा बाबत जो फलक लावण्यात आला आहे त्याबद्दल केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. काजू बागायतदार शेतकरी आणि बागायतदार संघाचे प्रतिनिधी यांची आणि कारखानदार यांच्यात समन्वय घडवून आणला आणि काजू दराबाबत निश्चिती केली. तसेच काजू बी प्रतिकिलो अनुदान १० रूपये दिले. मात्र आचारसंहितेमुळे ते निवडणुकीनंतर होईल असेही केसरकर यांनी सांगितले.काजू बोर्ड स्थापन करून पुढील वर्षी काजू खरेदीला प्राधान्य दिले जाईल. काजू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जनतेसोबत आम्ही आहोत, त्यामुळे उध्दव शिवसेना फक्त आग लावायचा धंदा करत आहे असा आरोप ही केसरकर यांनी केला.
'तो' फलक लावण्याचे काम उद्धव सेनेचे, दीपक केसरकर यांचा आरोप
By अनंत खं.जाधव | Updated: May 4, 2024 19:46 IST