शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

दिल्लीच्या तख्तावरही भगव्याची प्रतिष्ठापना करू - उद्धव ठाकरे 

By सुधीर राणे | Updated: February 5, 2024 17:49 IST

'आता एकच नारा द्यायचा, अब की बार, भाजप तडीपार'

कणकवली: युद्ध जिंकायची असतील तर फक्त तलवारीने जिंकता येत नाहीत. तर त्यासाठी मनगटात ताकद हवी, मनही खंबीर हवे. आगामी निवडणूक आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. भाजपला सत्तेतून दूर करून आपणाला पुन्हा एकदा भगव्याची  प्रतिष्ठापणा विधानसभेतच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावरही करावी लागेल असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या जनसंवाद यात्रे निमित्तच्या  जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश कोरगावकर, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, मुंबईचे  माजी महापौर दत्ता दळवी, सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभा मतदारसंघप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले,  भाजपवाले आता नारा देत आहेत, 'अब की बार चारसो पार' , मग त्यांच्यात हिंमत असेल तर स्वतःच्या हिमतीवर त्यांनी तेवढे खासदार निवडून आणावे. चारसो पारची खात्री असेल तर का फोडाफोडी करता? तिकडे नितीशकुमारना फोडले, सोरेनना अटक करता, ईडी, सीबीआय पाठी लावता, म्हणूनच यावेळी आता एकच नारा द्यायचा, अब की बार, भाजप तडीपार'. कोकणच्या या दौऱ्यात भगवे वादळ दिसत असून ते दिल्लीच्या दिशेने पुढे सरकत आहे, तुमची साथ अशीच असेल तर भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन मी उचलल्याशिवा राहणार नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा