शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सावंतवाडी नगरपरिषदेचा प्रकल्प राज्याने स्वीकारला, बांधकामाच्या ऑनलाईन परवानगीची राज्यात अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:47 IST

एक वर्षांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने बांधकाम त्या परवानग्या देणे सुरू केले होते

अनंत जाधवसावंतवाडी : राज्य सरकारच्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत ऑफलाईन बांधकाम परवानगी  पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा पायलट प्रोजेक्ट सावंतवाडी नगरपरिषद ने राबवला त्यात बऱ्यापैकी यश आल्यानंतर हा प्रोजेक्ट राज्य सरकारने स्वीकारत त्याची संपूर्ण राज्यात अमलबजावणी केली.एक वर्षांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने बांधकाम त्या परवानग्या देणे सुरू केले होते तर राज्य सरकार कडून अलीकडेच याबाबत अध्यादेश काढत ऑनलाईन पद्धतीने परवानग्या दिल्या जाव्यात असे सांगितले. ऑनलाईनमुळे पारदर्शकता येत असली तरी पालिकेच्या उत्पन्नावर मात्र थोडाफार का होईना परिणाम झालेला दिसून येत आहे.

साॅप्टवेअरमध्ये त्रुटी

  • 30 जून पासून ऑफलाइन परवानगी बंद झाली त्यानंतर ऑनलाईन काम सुरू झाले परंतु सॉफ्टवेअरच्या त्रुटीमुळे पहिल्यांदा अडचणी येत होत्या आता मात्र या अडचणी थोड्या कमी होऊ लागल्या आहेत.
  • सुरुवातीला ऑफलाइनमुळे नागरिक थेट पालिकेमध्ये येऊन आपली कामे करून घेत होती पण आता ऑनलाइन परवानगी मुळे नागरिकांना हा ऑनलाईन अर्ज कसा भरावा याचे मार्गदर्शन केले जात आहे. 

बांधकाम परवानगी ओघ कमीसावंतवाडीत वर्षाकडे 100 च्या आसपास परवानग्या देण्यात येतात मात्र पावसाळ्याला सुरुवात झाली की बांधकाम परवान ग्याचे.प्रमाण घटते अनेक जण आपली कामे पावसाळ्यात बंद ठेवतात त्यामुळे बांधकाम परवानगीचा पावसाळ्यात कमी झाल्याचे दिसून येत आहे.

नगरपालिकेचे उत्पादन निम्म्यावरऑनलाईन बांधकाम परवानगीमुळे नगरपालिकेच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे व्यवहार पारदर्शक झाले असले तरी नागरिकांना कामासाठी सतत नगरपालिका अधिकाऱ्यांकडे ये जा करावी लागत नाही.

ऑनलाईन पद्धत भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण

शासनाने नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन बांधकाम परवान्यांचा फायदा ही आहे आणि तोटाही आहे फायदा असा आहे की एकदा कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने समेट केल्यावर सतत पालिकेत जावे लागत नाही तर तोटा असा आहे जर कागदपत्रे समेट करताना त्यातील एखादा कागद जरी राहिला तर परवानगी नाकारते. - अजय गोंदावले, बांधकाम व्यावसायिक

ऑनलाइन पद्धतीमुळे फायदा होत आहे यातून काही प्रमाणात खर्चाची बचती होऊ लागली असून फायलींवर झालेल्या कारवाईची स्थिती पाहता येते त्यामुळे ही पद्धत चांगली असल्याचे सर्वसामान्यातून तसेच बांधकाम व्यवसायिक ही म्हणत आहेत.  - बांधकाम व्यावसायिक

ऑनलाईन परवानगी सोयीची

सावंतवाडीत ऑनलाईन परवानगी पध्दत एक वर्षापूर्वी पासून लागू आहे सावंतवाडी नगरपालिकेने पायलट प्रोजेक्ट राबवला होता त्याची अमलबजावणी आता राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.ही पध्दत चांगली असून ऑनलाईन परवानगी ला कागदपत्रे सुस्थितीत असतील तर अडचणी येत नाहीत.  - सुधाकर गजबार, बांधकाम अधिकारी,  सावंतवाडी नगरपरिषद

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग