शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: रस्त्याची दुरुस्ती, तिलारी घाट आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:24 IST

तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत एसटी व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता

दोडामार्ग : तिलारी घाटाच्या डागडुजीसाठी सोमवारपासून घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. घाटातील तुटलेले संरक्षक कठडे आणि जयकर पॉइंट येथील खचलेल्या रस्त्याची डागडुजी हाती घेण्यात आली असून, ती महिनाभरात पूर्ण होणार आहे.तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत एसटी व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, एसटी वगळता इतर अवजड वाहनांची वाहतूक राजरोसपणे तिलारी घाटातून सुरू होती. दरम्यान, घाटातील जयकर पॉइंट येथे अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग खचला. एसटी बंद झाल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. घाटातून एसटी पुन्हा सुरू व्हावी यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, कोदाळी माजी सरपंच अंकुश गावडे व स्थानिक ग्रामस्थांनी विविध आंदोलन, उपोषण केले.स्थानिकांचा प्रशासनाविरोधात वाढता उद्रेक पाहता एसटी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे बनले. त्यामुळे प्रशासनाने घाटातून एसटी उतरवून प्रात्यक्षिकही घेतले. यावेळी खचलेल्या रस्त्याचे सबब एसटी महामंडळाने पुढे केले. त्यामुळे चंदगड बांधकाम उपविभागाने खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यास मंजुरी प्राप्त करून घेतली.सोमवारपासून खचलेल्या रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने काम करत असताना तेथे कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याची सबब पुढे करत या घाटातील वाहतूक थांबविण्यात यावी, अशी मागणी चंदगड बांधकाम उपविभागाने येथील पोलिस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे हा घाट सर्वच वाहनांसाठी सोमवारपासून बंद झाला आहे.हे आहेत पर्यायी मार्ग

  • दोडामार्ग-मांगेली तळेवाडी ते चोर्लेमार्गे बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे.
  • तसेच दोडामार्ग-साखळी ते चोर्ला घाट मार्गे बेळगाव आणि तळकट-कुंभवडे-आंबोली मार्गेही बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे.
  • मोर्ले ते पारगड हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नसला तरी काहीजण या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे. यात दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करणाऱ्यांची पंचाईत होणार आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक