शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:58 IST

चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभमुहूर्त केला.

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सीताराम शिंदे या दोन युवकांनी आपल्या बागेतील हापूसचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊन देवदिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून आंबा काढण्याचा शुभारंभ केला. पहिली दोन डझनांची पेटी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच मुंबई वाशी मार्केट येथील सुप्रसिद्ध व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर पाठविण्यात आली. सकाळी आठ वाजता आंबे काढून या पेटीच्या शुभारंभ करण्यात आला.कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे व दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर याठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्ट पासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला. चार ते पाच कलमावरील मोहोर तसाच टिकून राहिला आणि तो टिकवण्यासाठी या शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच या चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभमुहूर्त केला.त्या पेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली स्वतः आंबा बागायतदार शिंदे हे ही आंबा पेटी घेऊन वाशी मार्केटला रवाना झाले आहेत. आमदार नितेश राणे यांनी देखील या दोन्ही शिंदे युवा बंधूंचे कौतुक केले आहे. यावेळी आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे,नरेश डामरी, पप्पू लाड आदी उपस्थित होते.सात ते आठ हजारांचा भाव मिळण्याचा अंदाजया दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजारच्या आसपास भाव मिळेल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. मात्र यावर्षी आंबा सिझन पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवीच येत आहे. अशावेळी हापूसच्या कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन युवा आंबा बागायदारांनी पाठविली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणMangoआंबाMumbaiमुंबईMarket Yardमार्केट यार्ड