शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
4
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
5
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
6
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
7
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
8
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
9
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
10
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
11
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
12
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
13
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
14
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
15
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
16
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
17
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
18
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
19
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

sindhudurg: पत्नी समोरच शेतकरी गेला ओढ्याच्या पाण्यात वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:54 IST

रात्री साडेदहाला आढळला मृतदेह

कणकवली : कळसुली, लिंगेश्वरनगर (गवसेवाडी) येथील महेश दिनकर देसाई (५२) या शेतकऱ्याचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आपल्या स्वत:च्या शेतीबरोबरच मोलमजुरी करून ते आपला व पत्नीचा उदरनिर्वाह करत असत. त्यांना अपत्य नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. इंदिरा आवास घरकुल योजने अंतर्गत त्यांना घर मिळाले होते. त्यांना गुरे पाळण्याची आवड होती.महेश देसाई यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने तिला मोठा धक्काच बसला आहे.महेश देसाई हे गुरुवारी सकाळी पत्नीसोबत कणकवली येथे बाजारात आले होते. तेथील काम आटोपून ते दोघे कणकवली-कळसुली एस.टी. बसने परत घरी जायला निघाले. कळसुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ते उतरले. तेथून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी जाण्यास निघाले. वाटेतील ओढा ओलांडताना पावसामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात महेश देसाई वाहून गेले. त्यांच्यासोबत असलेल्या पत्नीने आरडाओरडा केला. मात्र,जवळपास कोणीच नसल्याने मदत मिळू शकली नाही.ओढ्यात आढळून आलेला तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनाकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तसेच शवविच्छेदनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.देसाई यांना शोधण्यासाठी कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये, ग्रामस्थ आनंद देसाई, विजय देसाई, पंढरी देसाई, आत्माराम नार्वेकर, बाळा कदम, पोलिस पाटील महेश केसरकर,निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव,पोलिस हवालदार मिलिंद देसाई आदी नागरिकांनी प्रयत्न केले.

रात्री साडेदहाला आढळला मृतदेहपत्नीने तातडीने गवसेवाडीत धाव घेत तेथील लोकांना या दुर्घटनेबाबत सांगितले तसेच काही नागरिकांनी सरपंच ,पोलिस पाटील, महसूल व पोलिस प्रशासनालाही कळविले. त्यानंतर सर्वजण रात्रीच्या अंधारात महेश देसाई यांचा शोध घेत होते. सुमारे साडेतीन तासानंतर रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह कळसुली, कुमाठ येथील ओहोळाच्या पाण्यात एका झुडुपाला अडकलेल्या स्थितीत आढळून आला.