शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Sindhudurg: ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला, पोलिस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:41 IST

शेजारी राहणारा सहकारी सुटीवरून परतल्यावर घटना झाली उघड

वैभववाडी : ग्रामीण रुग्णालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सखाराम धर्मा वाझे (५२) मृतावस्थेत शासकीय निवासस्थानात आढळले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सोमवारी (दि.१४) रात्री ही घटना उघड झाली. दरम्यान त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.येथील ग्रामीण रुग्णालयात सखाराम वाझे हे लिपिक पदावर कार्यरत होते. रुग्णालयाशेजारीच शासकीय कर्मचारी निवासस्थानात (क्वॉर्टर्स) ते राहत होते. शुक्रवारी ते आपली ड्युटी संपवून निवासस्थानी गेले होते. त्यानंतर ते दोन दिवस कोणालाही दिसून आले नव्हते. दरम्यान, त्यांच्या शेजारी राहणारे सहकारी सोमवारी रात्री सुटीवरून परतले. तेव्हा त्यांना बाजूला वाझे राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. या खोलीला आतून कडी होती. त्या कर्मचाऱ्याने वाझे यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला, मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही.ही बाब त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सांगितली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत त्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी वाझे यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. या प्रकाराची माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिली. त्यामुळे मंगळवारी(ता.१५) सकाळीच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर शवविच्छेदन करुन सायंकाळी मृतदेह ताब्यात देण्यात आला.

मूळचे पुणे सिन्नर येथील रहिवासीवाझे हे मूळचे सिन्नर-पुणे येथील राहणारे होते. ते गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पदोन्नती झाली होती. मात्र, व्यसनामुळे त्यांची कारकीर्द अनेकदा वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीvaibhavwadiवैभववाडीhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस