शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडीत ‘भराडी’चा जयघोष! दक्षिण कोकणच्या काशीचा यात्रोत्सव भक्तीमय वातावरणात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:31 IST

राजकीय नेत्यांची मांदियाळी

मालवण/आंगणेवाडी: 'आंगणेवाडीची भराडी देवी' या नावाने अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोकणच्या काशीचा वार्षिक जत्रोत्सव आज, सोमवारी पहाटेपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला. पहाटे ठीक तीन वाजता देवीच्या दर्शनाचे द्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले आणि अवघी आंगणेवाडी 'आई भराडी'च्या जयघोषाने दुमदुमून गेली.यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे देवीची विधीवत पूजा, अभिषेक आणि अलंकार चढवण्यात आले. त्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या वतीने मानाची पूजा अर्चा पार पडली. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या यात्रेसाठी मुंबई, पुणे आणि गोवा येथून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले असून, मालवणच्या दिशेने येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.भक्तांच्या सुविधेसाठी चोख व्यवस्था प्रशासनाने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा विशेष काळजी घेतली आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य पथके आणि निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. दर्शन रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी 'आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळा'चे शेकडो स्वयंसेवक तैनात आहेत. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर ठेवली जात आहे.

राजकीय नेत्यांची मांदियाळीआंगणेवाडीच्या जत्रेला राजकीय दृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. आज दिवसभरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते देवीच्या चरणी लीन होण्यासाठी येण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि 'शक्तिप्रदर्शन' यात्रेचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.

श्रद्धेचा जनसागर आणि बाजारपेठजत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील विस्तीर्ण बाजारपेठ. खाजा, मातीची भांडी आणि कोकणी मेव्याच्या दुकानांनी परिसर गजबजला आहे. विशेष म्हणजे, नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्याने हजारो भाविक आपला नवस फेडण्यासाठी येथे दाखल होत आहेत. 'ओटी' भरण्यासाठी महिला भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anganewadi Jatra 2026: Devotees Throng South Konkan's Kashi for Auspicious Festival

Web Summary : Anganewadi Jatra, South Konkan's Kashi, commenced with fervor as devotees thronged for blessings. The temple doors opened at dawn, with rituals, prayers, and a bustling marketplace. Political leaders are expected to visit amid tight security and devotee facilities.