शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली वनविभागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर संपली, उपवनसंरक्षकांनी लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:21 IST

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

अनंत जाधवसावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाला आंबोलीत पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. कोणताही प्रकल्प राबवला तरी तो पाण्याअभावी वाया जात होता. याची दखल घेत उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी गंभीर दखल घेत नैसर्गिक पाण्याचे स्रोतातून थेट पाइपलाइनने हे पाणी नाममात्र खर्चात वनविभागाच्या आवारात आणले. उपवनसंरक्षकांच्या या एका निर्णयाने वनविभाग पाण्यात स्वयंपूर्ण झाल्याचे दिसून आले आहे.

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे तर येथील वनविभाग पाण्यासाठी वणवण करत होता. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये हे वेगवेगळ्या विकासकामासाठी खर्च होत असतात; पण हे सर्व प्रकल्प पाण्याअभावी पडून राहात किंवा खर्च तरी वाया जातो.

येथील फुलपाखरू गार्डनवर तर दोन वेळा खर्च करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात हे गार्डन करपून गेले, असे अनेक प्रकल्प आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या उपाययोजना ही तुटपुंज्या ठरल्या. त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाकडे लक्ष दिले; पण पाण्याकडे लक्षच दिले नाही.

मात्र सध्याचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे त्याला अपवाद ठरले असून, त्यानी आंबोलीतील निसर्गाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तसेच कायमस्वरूपी पाण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आंबोलीत नैसर्गिक पाणी स्त्रोत भरपूर आहेत मग त्यातून पाणी आणले तर मोठा खर्चही येणार नाही.

म्हणून त्यांनी तेथील परिक्षित पॉइंट येथे पाण्याच्या असलेल्या झऱ्याला पाइपलाइन टाकून ते पाणी थेट आंबोली वनबागेत आणण्यात आले. तब्बल दीड किलोमीटरची पाइपलाइन आहे. या एका निर्णयामुळे आंबोलीतील वनविभागाची पाण्यासाठी होणारी वणवण कायमस्वरूपी सुटली आहे. वनविभाग पाणीप्रश्नात कायमस्वरूपी स्वयंपूर्ण बनला आहे. उपवनसंरक्षक नारनवर यांनी घेतलेला एक निर्णय फायदेशीर ठरलाच, शिवाय शासनाचे कोट्यवधीचे नुकसानही टळले आहे.

कमी खर्चाचा, कायमस्वरूपी टिकणारा प्रयोग

आंबोलीत अनेक प्रकल्प आम्ही करत होतो. पण पाणी नसल्याने हे. प्रकल्प काही दिवसातच बंद पडत होते. पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण हे सर्व प्रयोग तुटपुंजे ठरले. मात्र हा प्रयोग कमी खर्चाचा असून, कायमस्वरूपी टिकणारा आहे. - शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनforest departmentवनविभागWaterपाणी