शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पावसाचा जोर ओसरला, सिंधुदुर्गात शेतीची कामे आली शेवटच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:12 IST

पाउस दिवसभरात अधूनमधून सरींच्या रूपाने बरसत आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. रात्रीच्या वेळी संततधार पडत असलेला पाउस दिवसभरात अधूनमधून सरींच्या रूपाने बरसत आहे. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने शेतीची कामेही आता शेवटच्या टप्प्यात आली आहेत. गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ५२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३१.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १७०५.५ मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड-१९.९ (१४११.७), मालवण-२३.३ (१६१०.५), सावंतवाडी-३५.२ (२०३४.६), वेंगुर्ला- १८.७ (१७५४.२), कणकवली-४४.३ (१५७२.७), कुडाळ-३१.२(१८३२.४), वैभववाडी- ५२.८ (१७५९.४), दोडामार्ग- ३३.३ (१९४३.१) असा पाऊस झाला आहे.शुक्रवारी सकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार  - तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३९.८०० मी. आहे. या नदीची धोका पातळी ४३.६०० मीटर इतकी आहे. कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ ६.५०० मीटर आहे. धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी ३.९०० मीटर इतकी असून धोका पातळी १०.५०० मीटर इतकी आहे. गडनदीची पातळी ३४.८०० मीटर इतकी असून धोका पातळी ३७.९२० मीटर इतकी आहे.तिलारी धरण ८५ टक्के भरलेतिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ५३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३७७.९९५ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ८४.४९ टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण ६ हजार २७८.६१२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील नद्यांमधील पाणी पातळी आता वाढली असली तरी कुठलीही धोक्याच्या पातळीवर नाही. पावसाचा जोर ओसरला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीRainपाऊस