शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

..म्हणूनच भाजपकडून उत्तर भारतीयांच्या संघटनेची स्थापना, मनसे नेते परशुराम उपरकर यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: November 10, 2023 17:50 IST

सिंधुदुर्गात उत्तर भारतीयांचे लोण भाजपमुळेच 

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर आजवर भाजप वगळता एकाही पक्षाने परप्रांतीयांच्या संघटनेची मोट बांधली नाही. मात्र, आता मतपेटीवर डोळा ठेवून भाजप उत्तर भारतीयांची संघटना बांधून नेमके काय सिद्ध करू पाहत आहे ? असा सवाल करतानाच सिंधुदुर्गात उत्तर भारतीयांचे लोण भाजपमुळेच जास्त पसरत असल्याची स्थिती आहे असा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, चोरी, दरोडे, अत्याचार आदी गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांचा विचार केल्यास अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश, बिहार मधील गुन्हेगारच सर्वत्र जास्त प्रमाणात आढळत आहेत. परप्रांतीयांनी सिंधुदुर्गातील युवकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. एकीकडे आमदार नितेश राणे परप्रांतीयांविरोधात बोलत असताना दुसरीकडे भाजपाचे पदाधिकारी मात्र उत्तर भारतीयांची संघटना स्थापन करून त्यांचे लाड करत आहेत. या परप्रांतीयांची नोंदणी सुद्धा रीतसर पोलिस यंत्रणेकडे होत नाही. त्याकडेही पोलिस अधीक्षकांचे लक्ष मनसे वेधणार आहे. वेळप्रसंगी त्यासाठी रस्त्यावरही उतरणार असल्याचे उपरकर म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक सरपंच आणि सदस्य भाजपचे निवडून आले. याची दिवाळी भेट म्हणून परप्रांतीयांची संघटना भाजप निर्माण करीत आहे काय ? जिल्ह्यात गरीब, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यामध्ये याच परप्रांतीयांची नावे मोठ्या प्रमाणात समोर येतात. परप्रांतियांकडे यावेळी दुर्लक्ष केल्यास भविष्यात उत्तर भारतीय सरपंच सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. अशी सध्याची स्थिती आहे. उत्तर भारतीयांचे लोण जिल्ह्याभर  भाजप पसरवत आहे. जिल्हावासीयांनी एकत्रितपणे ते रोखायला हवे, अन्यथा पुढील काळात पश्चाताप करायची वेळ येईल. परप्रांतीयांची संघटना करून भाजप मतांची बेरीज करीत असेल तर त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी एकत्रितपणे उत्तर देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी परप्रांतीयांबाबतच्या आपल्या तक्रारी  मनसेकडे द्याव्यात. परप्रांतीयांच्या अन्याया विरोधात नागरिकांनी आंदोलन करावे, मनसे त्याला निश्चितच पाठींबा देईल असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेBJPभाजपाPoliticsराजकारण