शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संदेश पारकर यांची नितेश राणेंवर टीका

By सुधीर राणे | Updated: October 10, 2023 15:37 IST

सत्ता आणि पैशाच्या गुर्मीतूनच देवगड येथे सरकारी रुग्णालयाच्या दुरवस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाणीचा प्रयत्न

कणकवली: सत्ता आणि पैशाच्या गुर्मीतूनच देवगड येथे सरकारी रुग्णालयाच्या दुरवस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाणीचा प्रयत्न झाला आहे. मात्र, कोकणात कुणाचाही माज जास्त काळ चालत नाही. हे राणे यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये अनुभवले आहे. २०२४ मध्ये कणकवलीत त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असून नितेश राणेंना आता जनताच धडा शिकवेल असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लगावला. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकशाहीत जनतेचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम आहे. आमच्या शिवसैनिकांनी ते काम केले. नांदेडसारखी घटना  देवगड, कणकवली किंवा सिंधुदुर्गात घडू नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या शिवसैनिकांना नितेश राणे यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. आमदार स्वतः आमच्या शिवसैनिकाला खेचून गाडीत घेऊन जात होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांची दांडगाई सुरु होती. तर पोलिस बघ्याची भूमिका घेत होते. सिंधुदुर्ग मागास होत असल्याचे हे निदर्शक आहे. पण, शिवसेना तसे कधीही घडू देणार नाही, हे लक्षात ठेवावे. यात पोलिसांनी जी भूमिका घेतली, ती संशयास्पद आहे. पोलिस निरीक्षकांसमोरच देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या  अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? याचा जाब आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांना विचारणार आहोत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या खात्याच्या शिस्तीचा टेंभा मिरवीत असतात. मात्र  देवगडमध्ये त्यांच्या खात्याची अब्रू त्यांच्याच आमदाराने धुळीस मिळवली आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर असे शेकडो गणेश गावकर गावागावात तयार होतील आणि कामाचा जाब विचारतील, हे लक्षात ठेवावे.जनतेचे प्रश्न आमदारांसमोर मांडायचे नाहीत तर काय अमेरिकेच्या अध्यक्षासमोर मांडायचे का? हे राणे यांनी स्पष्ट करावे. जनतेचा आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकांना झालेली मारहाण आम्ही कदापिही सहन करणार नाही. संपूर्ण  महाराष्ट्रातील शिवसेना आम्ही देवगडच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभी करू. देवगडला समंजस नेतृत्वाची परंपरा आहे. आप्पासाहेब गोगटे, अमृतराव राणे अशा सुसंस्कृत लोकांनी देवगडचे प्रतिनिधित्व केले आहे. आम्हाला त्या आमदारांचा अभिमान आहे. मात्र, नितेश राणे यांनी त्या गौरवशाली परंपरेला छेद दिला आहे. शांतताप्रिय देवगड तालुक्यातील जनतेने हे लक्षात घ्यावे. तसेच भाजपला आगामी निवडणुकीत धडा शिकवावा. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवली