शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: ठाकरे गट शिवसेना, भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले; पावशी गावात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:41 IST

वादंग चालू असताना आमदार वैभव नाईक यांनी नळपाणी योजनेचे भूमिपूजन केले

कुडाळ : पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या भूमिपूजनावेळी ठाकरे गट शिवसेना व भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावशी मिटक्याची वाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतील कामांच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगावकर, सरपंच वैशाली  पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे, कृष्णा तेली, संतोष अडूलकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे, रुणाल कुंभार, रमेश कुंभार, स्वरूप वाळके, राजन जाधव, ओंकार करगुटकर, हेमंत तवटे, समीर तेली, राजा चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी येथील काम बंद आदेश आहे. त्यामुळे भूमिपूजन करू नका, असे सांगितले, यानंतर ठाकरे गट व भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर काही वेळाने आमदार नाईक यांनी या कामाचे भूमिपूजन केले.यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी सांगितले की, या ठिकाणी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतून फक्त पाइपलाइन मंजूर आहे; परंतु येथील धनगर माळावरती असलेल्या मुख्य पाइपलाइनने पाणी या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार येथील नळ पाणी योजनेची पाइपलाइन घालू नये याकरिता ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडे "काम बंद' करण्याची मागणी केली होती. ज्या विभागाकडून काम चालू आहे. त्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून काम बंद'चे आदेश तोंडी देण्यात आले होते.असे असतानाही आमदार वैभव नाईक हे या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी उपस्थित होते. येथील कामाचे भूमिपूजन केल्यावर ते काम चालू होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. ग्रामस्थ व त्या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांमध्ये वादंग चालू असताना आमदारांनी पाठीमागे गुपचूप नारळ वाढवून, भूमिपूजन करून ते निघून गेले, अशी प्रतिक्रिया श्रीपाद तवटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा