टेम्पोला धडकून दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: June 8, 2014 01:12 IST2014-06-08T01:02:44+5:302014-06-08T01:12:18+5:30
एडगाव येथे टेम्पोला समोरुन धडकल्याने तळेरे वाघाचीवाडी (ता. कणकवली) येथील राजेंद्र दत्ताराम भोगले (वय ३६) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

टेम्पोला धडकून दुचाकीस्वार ठार
वैभववाडी : एडगाव येथे टेम्पोला समोरुन धडकल्याने तळेरे वाघाचीवाडी (ता. कणकवली) येथील राजेंद्र दत्ताराम भोगले (वय ३६) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
राजेंद्र चालवत असलेला टेम्पो काल, शुक्रवारी रात्री करुळ येथील तारांगण हॉटेलनजीक बंद पडला होता. त्यामुळे राजेंद्र आपल्या घरी गेला होता. आज, शनिवारी दुपारी तो दुचाकीवरून (एम.एच. ०८, पी. ११६५) करुळ येथे बंद पडलेल्या टेम्पोकडे निघाला होता. शहीद साळसकर स्मारकासमोरच्या वळणावर वैभववाडीकडे येणाऱ्या टेम्पोला ( एम.एच.0७,पी. ७६३) राजेंद्र दुचाकीसह धडकला. यात राजेंद्र रस्त्यापासून सुमारे १० फुटांवर उडाला, तर दुचाकी २० ते २५ फूट फरफटत गेली. राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत राजेंद्र हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात चार भाऊ आहेत. (प्रतिनिधी)