शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातून कोल्हापूर, बेळगावला जाणाऱ्या संकेश्वर-बांदा मार्गाच्या अभ्यासासाठी पथक सिंधुदुर्गात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 23:40 IST

Sindhudurg News : नव्याने केंद्र सरकारच्या रस्ते विकास विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले ला बांदा संकेश्वर मार्ग हा कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयांना जोडला जाणार आहे.या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.

- अनंत जाधवसावंतवाडी - सिंधुदुर्ग कर्नाटक व कोल्हापूर जिल्हयांना जोडल्या जाणाºया संकेश्वर बांदा या महामार्गाचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी केंद्रिय रस्ते वाहातूक मंत्रालयाचे पथक बुधवारी सिंधुदुर्गात दाखल झाले या पथका ने गुरूवारी दिवसभर आंबोली तसेच बावळट इन्सुली मार्गाची पाहाणी केली आहे.हे पथक ग्रामस्थांच्या अडचणी तसेच महामार्ग हस्तातंरासाठी लागणारी जमिन यांची माहीती घेत असून,हा मार्ग सावंतवाडीतून गेल्यास येणारा खर्च  तसेच बावळट मार्गे होणारा खर्च आंबोली घाट रस्त्याची माहीती हे पथक घेत आहे.नव्याने केंद्र सरकारच्या रस्ते विकास विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले ला बांदा संकेश्वर मार्ग हा कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयांना जोडला जाणार आहे.या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी गेले दोन सिंधुदुर्ग मध्ये आले आहेत.या अधिकाºयांनी सुरूवाती ला संकेश्वर येथून या रस्त्याची सुरूवात होणार असल्याने तेथे पाहाणी केली त्यानंतर हे पथक सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाले आहे.बुधवारी या पथकाने सावंतवाडी येथे येउन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने तसेच उपविभागीय अभियंंता संजय आवटी यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर गुरूवारी या पथकाने प्रत्यक्ष सातुळी बावळट तसेच बांद्या पर्यंत जाउन पाहाणी केली त्यानंतर सावंतवाडी शहर व इन्सुली येथील रस्त्या ची पाहाणी केली.हे पथक प्रत्यक्ष रस्त्याची पाहाणी करणार असली तरी प्रामुुख्याने हा मार्ग कुठून बांदा येथे जोडणे सोयीस्कर होईल यांचीही माहीती घेत आहे.हे पथक रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करत असतनाच रस्त्याला प्रत्यक्षा त येणारा खर्च तसेच कमी होणारे अंतर भूसंपादन कमीत कमी होईल असा मार्ग ग्रामस्थांच्या समस्या यांची माहीती हे पथक घेउन तसे या अहवालात नमूद करणार आहे.या पथकामध्ये चार अधिकारी असून,या मार्गासाठी नेमण्यात आलेल्या खाजगी एजन्सीचे अधिकारी ही सहभागी झाले होते.पण सध्यातरी हे पथक कोणत्या मार्गावर शिक्कामोर्तब करणार हे अद्याप निश्चीत झाले नसून,सर्व अभ्यास केल्यानंतर केंद्र सरकारच्या रस्ते महामार्ग विभागा ला हा संपूर्ण अहवाल पथक देणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पथक आले आहे :श्रीकांत मानेया पथकाबाबत बांधकाम विभागाचे कार्यंकारी अभियंता श्रीकांत माने यांना विचारले असता,पुणे येथून आलेले पथक बांदा तसेच सातुळी बावळट येथील रस्त्याची पाहाणी करत आहे.तसेच त्यानी सावंतवाडी व इन्सुली येथील रस्त्याची ही पाहाणी बुधवारी केली आहे.हे पथक ग्रामस्थांच्या अडचणी तसेच रस्त्यासाठी जागा हस्तातंरण याबाबत माहीती घेत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव