सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावचा तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 18:20 IST2017-09-07T18:18:56+5:302017-09-07T18:20:43+5:30

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावच्या तलाठ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत खात्याने गुरुवारी सायंकाळी रंगे हाथ जाळ्यात पकडले. संजय जयराम गावडे असे त्याचे नाव आहे.

The talathi of Ronda village in Sawantwadi tehsil is in the trap of bribe latchpath | सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावचा तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावचा तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात

ठळक मुद्देदोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हाथ पकडलेजमिनीची सातबाराची रजिस्टर नोंद करण्यासाठी लाच अधिक तपास सुरू

सावंतवाडी, दि. ७ : सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावच्या तलाठ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत खात्याने गुरुवारी सायंकाळी रंगे हाथ जाळ्यात पकडले. संजय जयराम गावडे असे त्याचे नाव आहे.

खरेदी आणि विक्री केलेल्या जमिनीची सातबाराची रजिस्टर नोंद करण्यासाठी यापूर्वी आरोपी संजय जयराम गावडे याने ११ हजार रुपयांची लाच स्वीकारली होती, मात्र उर्वरित रक्कम दोन हजार रुपये आज गुरुवारी स्वीकारत असतानाच त्याला लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांच्या पथकाने त्याला जाळ्यात पकडले.

त्याच्याविरोधात ला.लु.प्र.का.१९८८ चे कलम ७,१३(१)(ड)सह १३(२) कारवाई करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The talathi of Ronda village in Sawantwadi tehsil is in the trap of bribe latchpath