शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

अवैध धं‌द्यांवर तत्काळ कारवाई करा!, अन्यथा..; भाजपच्या शिष्टमंडळाचा पोलिसांना इशारा

By सुधीर राणे | Updated: May 30, 2024 15:54 IST

कणकवली : तालुक्यात गेल्या काही महिन्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत ...

कणकवली: तालुक्यात गेल्या काही महिन्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. गांजा व तत्सम अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध धंद्यांवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांची गुरुवारी भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तसेच त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधीये, वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक गावांपर्यंत अवैध धंद्यांचीपाळेमुळे खोलवर गेलेली असतानाही पोलीस यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे तरुण वर्ग वाईट मार्गाकडे जात आहे. पोलिस केवळ आकडेवारी दाखवण्यासाठी एखाद दुसरी कारवाई करतात.  मात्र, त्यानंतर हे अवैध धंदे पुन्हा नव्या जोमाने सुरू झालेले दिसून येतात. पोलिसांनी या सर्व गोष्टींवर तातडीने कडक पावले उचलावीत. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी लागेल असेही म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीPoliceपोलिस