नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा :
By Admin | Updated: July 14, 2014 23:34 IST2014-07-14T23:31:00+5:302014-07-14T23:34:06+5:30
कुलकर्णी

नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा :
सिंधुदुर्गनगरी : पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ६ दुधाळ गायी/म्हैशींचे गट वाटप, राज्यात ठाणबद्ध पद्धतीने शेळी पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळून देण्याकरीता १० शेळ्या व १ बोकड असा गट वाटप या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना प्रथम प्राधान्य आणि त्यानंतर अत्यल्प भूधारक सुशिक्षित बेरोजगार नंतर बचतगटातील लाभार्थी याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरविलेला आहे. राज्यात १ हजार मांसल कुक्कुट पक्षीपालन व्यवसाय सुरु करणे या योजनेमध्ये अत्यल्प भूधारक प्रथम प्राधान्य त्यानंतर अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार नंतर बचतगटातील लाभार्थी याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरविलेला आहे, असे जिल्हा पशुधन अधिकारी यांनी सांगितले.
सन २०१४-१५ या वर्षी उपरोक्त तीनही नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ मिळविण्याकरीता इच्छुक आणि पात्र व्यक्तीकडून ७ जुलै ते ८ जुलै २०१४ या कालावधीमध्ये विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना योजनेचा सविस्तर तपशील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे.
मागील आर्थिक वर्षामध्ये तीनही योजनेमध्ये या योजनेचा लाभ मिळण्याकरीता ज्या व्यक्तींनी अर्ज सादर केलेले आहेत आणि ज्यांचे अर्ज परिपूर्ण तसेच वैध आहेत अशा व्यक्तींनी या योजनेचा सन २०१४-१५ मध्ये मिळण्यासाठी पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. मागील आर्थिक वर्षामध्ये तीनही योजनेमध्ये या योजनेचा लाभ मिळण्याकरीता ज्या व्यक्तींनी अर्ज सादर केलेले आहेत आणि ज्यांचे अर्ज परिपूर्ण तसेच वैध आहेत अशा व्यक्तींनी या योजनेचा सन २०१४-१५ मध्ये मिळण्यासाठी पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. व्ही. बी. कुलकर्णी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सिंधुदुर्ग यांनी केले आहे. (प्रतिनिधी