शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

तिरवडे तर्फ खारेपाटणमध्ये एका कुटुंबाला टाकलं वाळीत, तंटामुक्ती अध्यक्षावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 9:23 PM

गावच्या ग्रामदेवतेवर काही तरी केल्याच्या संशयावरुन तिरवडे तर्फ खारेपाटण (जि. सिंधुदुर्ग) येथील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

वैभववाडी, दि. 27 - गावच्या ग्रामदेवतेवर काही तरी केल्याच्या संशयावरुन तिरवडे तर्फ खारेपाटण (जि. सिंधुदुर्ग) येथील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा देवस्थान प्रमुखाच्या पुढाकाराने दत्ताराम भाऊ सावंत यांच्या कुटुंबावर संपूर्ण गावाने धार्मिक व सामाजिक बहिष्कार घातला आहे. बहिष्कृत सावंत यांच्या तक्रारीवरून तंटामुक्ती अध्यक्ष धकटू काशिराम घुगरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.याबाबत पोलिसातून मिळालेली अशी की, बहिष्कृत तक्रारदार दत्ताराम सावंत यांचे राहते घर तिरवडे तर्फ खारेपाटण येथील सावंतवाडीत आहे. सध्या त्यांच्या घरी ते स्वत:, पत्नी, सून आणि नातवंडे राहतात. तर त्यांचे मुलगे मुंबईला असतात. सावंत यांनी गावच्या देवस्थानावर काही तरी ठेवल्यामुळे देवाचे कौल होत नाहीत, असा मानक-यांना संशय आहे. त्यामुळे सावंत यांना मंदिरात बोलावून गावक-यांच्या उपस्थितीत ‘खात्रीचे कौल’  घेतले. परंतु सुरुवातीला कौल झाले नव्हते. मात्र, दुस-यांदा घेतलेले कौल सावंत यांच्या विरोधात गेल्यामुळे देवस्थानाचे प्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष धकटू घुगरे यांनी सावंत कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेऊन गावातील कुणीही कशालाही न जाण्याचे फर्मान सोडले.देवस्थानाचे प्रमुख व खुद्द तंटामुक्ती अध्यक्षांनी बहिष्कार घातल्यामुळे संपूर्ण गावाने त्यांच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दत्ताराम सावंत यांच्या गावातील कोणीही फिरकत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बँकेच्या कर्जावर सावंत यांनी पिठाची गिरण घेतली आहे. गावाच्या बहिष्कारामुळे कुणीही आपल्या घराकडे फिरकत नसल्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे, असे सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे. सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिरवडे तर्फ खारेपाटण गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व देवस्थानाचे प्रमुख धकटू काशिराम घुगरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत व्यक्ती संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याआधी दोन वाड्या होत्या बहिष्कृततिरवडे तर्फ खारेपाटण येथील सावंतवाडी आणि देवळेवाडी या दोन वाड्यांवर चार वर्षांपूर्वी बहिष्कार घालण्यात आला होता. त्या वाड्यांचा बहिष्कार मागे घेऊन त्यांना पुन्हा गावात घेण्यासाठी दोन वाड्यांकडून दंड म्हणून सोन्याचा मुलामा चढवलेली चांदीची डुकराची मूर्ती देवस्थानचे प्रमुख व तंटामुक्ती अध्यक्ष धकटू घुगरे यांनी करून घेतली होती, असे सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे.दहा वर्षे तेच आहेत तंटामुक्ती अध्यक्षशासनाने २००७ मध्ये तंटामुक्त गाव अभियान सुरु केले. तेव्हापासून गावच्या देवस्थानाचे प्रमुख म्हणून धकटू घुगरे हेच आजमितीस तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत. या काळात त्यांच्या आदेशाने चक्क दोन वाड्यांवर बहिष्कार घालण्यात आला होता. ही वस्तुस्थिती असतानाही शासनाने तिरवडे तर्फ खारेपाटण गावाला तंटामुक्त पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा विरोधी कायदा केल्यानंतर देवस्थानाच्या विषयातून बहिष्काराबद्दल दाखल झालेला हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा ठरला आहे.