शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरीत तंबाखू विरोधी जनजागृती रॅली, तंबाखूमुक्त जीवन जगा : शरद कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 14:58 IST

तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका हा मोठा आहे. त्याचबरोबर हृदय रोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे तरुणांनी व नागरिकांनी तंबाखूच्या व्यसनापासून लांब रहावे आणि तंबाखूमुक्त जीवन जगावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरद कुलकर्णी यांनी तंबाखू विरोधी दिन जनजागृती रॅली प्रसंगी केले.

ठळक मुद्देसिंधुदुर्गनगरीत तंबाखू विरोधी जनजागृती रॅलीतंबाखूमुक्त जीवन जगा : शरद कुलकर्णी

सिंधुदुर्गनगरी : तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका हा मोठा आहे. त्याचबरोबर हृदय रोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे तरुणांनी व नागरिकांनी तंबाखूच्या व्यसनापासून लांब रहावे आणि तंबाखूमुक्त जीवन जगावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरद कुलकर्णी यांनी तंबाखू विरोधी दिन जनजागृती रॅली प्रसंगी केले.कर्करोगाचे वाढते प्रमाण हे तंबाखू सेवनात दडले असल्याने तंबाखूच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरुन प्रयत्न केले जात आहेत. ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाने राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत जनजागृती रॅली काढून तंबाखूपासून दूर राहण्याचा संदेश दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शरद कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखविला.यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी सुनिल पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक संतोष सावंत, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नदाप, डॉ पौर्णिमा बिडे, डॉ.शौनक पाटील, कर्मचारी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.आठ शाळा तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून विविध ११ निकष पूर्ण करणाऱ्या शाळा तंबाखूमुक्त शाळा घोषित केल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत ९० शाळांच्या भेटी पूर्ण झाल्या असून यापैकी ८ शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.यामध्ये विद्यामंदिर कणकवली, एस.एम. हायस्कूल कणकवली, कळसुली इंग्लिश स्कूल, एस.एल.देसाई विद्यालय पाट, आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली, वराडकर हायस्कूल कट्टा या सहा माध्यमिक विद्यालयांचा तर जिल्हा परिषद शाळा ओरोस आणि शाळा देवबाग या दोन प्राथमिक शाळांचा समावेश आहे.जनजागृती पंधरवडा साजरा केला जाणारजिल्हा परिषदेसमोर रॅली पोहोचताच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्ध्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम दाखविणारे पथनाट्य सादर केले. तसेच उपस्थितांनी स्वत:बरोबरच परिसर आणि राष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ घेतली. सायंकाळी जिल्हा न्यायालयातही तंबाखू जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व आजार याबाबत जनजागृती ह्यपंधरवडाह्ण साजरा केला जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायत, तलाठी, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, आठवडा बाजार आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहितीही यावेळी शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गanti gutka campaignगुटखाविरोधी मोहीम