पर्यटन वाढीसाठी जलतरणचे अनावरण

By Admin | Updated: January 29, 2015 00:10 IST2015-01-28T22:23:43+5:302015-01-29T00:10:54+5:30

बांदा येथे आजपासून लोकोत्सव : चित्ररथ स्पर्धेने प्रारंभ होणार

Swimming unveiling for tourism growth | पर्यटन वाढीसाठी जलतरणचे अनावरण

पर्यटन वाढीसाठी जलतरणचे अनावरण

बांदा : येथील पाटेश्वर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या बांदा लोकोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी दुपारी ३ वाजता भव्य चित्ररथ स्पर्धेने व शोभायात्रेने होणार आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी येथील तेरेखोल नदीपात्रात पर्यटन वाढीसाठी ‘पॅडल बोट’चे अनावरण करण्यात आले.२९ व ३0 जानेवारी या दोन दिवशी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फूड स्टॉल, भव्य स्टॅच्यू स्पर्धा, समुह नृत्य, शरीरसौष्ठवपटू दिनेश कांबळी यांचे शरीरसौष्ठव प्रात्यक्षिक, लहान मुलांच्या विविध स्पर्धा तसेच बांद्यातील तब्बल ७५ हून अधिक कलाकरांचा सहभाग असलेला ‘अस्मिता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राम शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बांदा- शेर्ले तेरेखोल नदीपात्रात दोन पॅडल बोटीचे अनावरण ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार यांच्या हस्ते करण्यात आले. या बोटींमुळे येथील जलतरण पर्यटनाला वाव मिळणार आहे. तसेच नदीपात्रातील सृष्टिसांैदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने या बोटींचे अनावरण करण्यात आले. याचा लाभ बांदा शहरातील नागरिकांबरोबरच पर्यटकही घेत आहेत. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, मंदार कल्याणकर, लोकोत्सव समिती अध्यक्ष सुधीर शिरसाठ, विशांत पांगम, सनी काणेकर, प्रवीण नाटेकर, आबा धारगळकर, विशाल मळेवाडकर, राकेश केसरकर, सुनील धामापूरकर, अमित धोंगडे, डॅनी आल्मेडा, दादू कविटकर, अशोक सावंत, गिरीश नाटेकर, मनाली नाईक, विश्वजीत शेट्ये आदींसह भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Swimming unveiling for tourism growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.