शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘स्वाभिमान’चा तेरा आॅगस्टला चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:25 PM

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या महामार्गाची दुर्दशा झाली असून, अपघातात काही व्यक्ती मृत्युमुखीही पडल्या आहेत. याला शासन तसेच महामार्गाचे काम करणारे ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे ११ आॅगस्टपर्यंत या रस्त्याची योग्य ती डागडुजी झाली नाही तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत महामार्गावर ठिकठिकाणी १३ ...

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या महामार्गाची दुर्दशा झाली असून, अपघातात काही व्यक्ती मृत्युमुखीही पडल्या आहेत. याला शासन तसेच महामार्गाचे काम करणारे ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे ११ आॅगस्टपर्यंत या रस्त्याची योग्य ती डागडुजी झाली नाही तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत महामार्गावर ठिकठिकाणी १३ आॅगस्टला चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची दिला आहे.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, सुरेश सावंत उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्ता वाहतूक योग्य ठेवणे ही ठेकेदारांची जबाबदारी आहे. तसे त्यांच्याशी केलेल्या करारनाम्यात नमूद केले आहे. मात्र, खड्डे दिसतात, पण रस्ते नाहीत अशी सध्याची स्थिती आहे. या दुरवस्थेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राणे यांनी उपस्थित केला. तसेच याबाबत शासनाला जाब विचारणार असल्याचेही सांगितले. ते पुढे म्हणाले, बांधकाममंत्री म्हणतात की, मला एक वर्ष द्या, रस्ते दुरुस्त करतो. मग मागील चार वर्षांत काय केलात? वारंवार तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती नाही. गणेशोत्सवाला केवळ दीड महिना शिल्लक राहिला कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, सुरेश सावंत उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्ता वाहतूक योग्य ठेवणे ही ठेकेदारांची जबाबदारी आहे. तसे त्यांच्याशी केलेल्या करारनाम्यात नमूद केले आहे. मात्र, खड्डे दिसतात पण रस्ते नाहीत अशी सध्याची स्थिती आहे. या दुरवस्थेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राणे यांनी उपस्थित केला. तसेच याबाबत शासनाला जाब विचारणार असल्याचेही सांगितले.ते पुढे म्हणाले, बांधकाममंत्री म्हणतात की, मला एक वर्ष द्या, रस्ते दुरुस्त करतो. मग मागील ४ वर्षांत काय केलात? वारंवार तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती नाही. गणेशोत्सवाला केवळ दीड महिना शिल्लक राहिला आहे. या उत्सवासाठी कोकणात अनेक चाकरमानी दाखल होत असतात. त्यांना त्रास होऊ नये यासाठी तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन व ठेकेदारच जबाबदार रहातील.महामार्ग चौपदरीकरणामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्यांची जबाबदारी ठेकेदारांची आहे. त्यांना नुकसान भरपाई ठेकेदाराने द्यावी.आतापर्यंत ६ मृत्यू आणि अनेक व्यक्ती जखमी होऊनही ठेकेदारावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलीस ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. या ठेकेदाराविरोधात आता पोलीस ठाण्यात स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी तक्रार नोंदवतील, असेही राणे यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर केवळ विकासाची आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात काहीच करीत नाहीत. त्यांनी गेल्या चार वर्षांत जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे नेला आहे. जिल्'ात राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्ग खड्ड्यात गेले आहेत. पालकमंत्री केवळ सावंतवाडीत फिरतात. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा त्यांना दिसत नाही. त्यांच्या स्वप्नातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते बांधतील तेव्हा बांधतील. मात्र त्यांच्यात धमक असेल तर जिल्'ातील शासकीय रुग्णालयात डॉक्टर, नर्स तसेच इतर रिक्त पदे त्यांनी आधी भरावीत आणि आरोग्य व्यवस्थेची स्थिती सुधारावी. जिल्'ाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. ग्रामस्थांना तातडीने सातबारा मिळत नाहीत.शिवसेनेची भूमिका दुटप्पी!केंद्र शासनाच्या अविश्वासदर्शक ठरावावर तटस्थ राहणाºया शिवसेनेने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगणे आवश्यक होते. सत्तेत राहून लाभ उठवितात; मात्र, ठरावाच्या वेळी मतदान करायचे नाही, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, असे राणे यावेळी म्हणाले.मराठा समाजाचाअंत बघू नकामराठा आरक्षणाबाबत शासनाने वेळेत आपले म्हणणे न्यायालयात सादर केले असते, तसेच आवश्यक कागदपत्रे जमा केली असती तर निर्णय लगेचच लागला असता. मात्र, तसे न झाल्याने या आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. मराठा समाजाने आतापर्यंत संयम पाळला आहे. यापुढे त्यांचा अंत शासनाने पाहू नये, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.