सावंतवाडीत स्वाभिमान तालुकाध्यक्षाची गाडी जाळली, अज्ञातांकडून प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:42 IST2019-03-12T07:42:23+5:302019-03-12T07:42:30+5:30

स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची इनोव्हा कार अज्ञाताने जाळली आहे. 

Swabhimaan tehsil president car was burnt in Sawantwadi | सावंतवाडीत स्वाभिमान तालुकाध्यक्षाची गाडी जाळली, अज्ञातांकडून प्रकार

सावंतवाडीत स्वाभिमान तालुकाध्यक्षाची गाडी जाळली, अज्ञातांकडून प्रकार

सावंतवाडी : स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची इनोव्हा कार अज्ञाताने जाळली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रकार रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आगीत पूर्ण कार जळून खाक झाली. ही कार परब यांनी आपल्या इमारतीच्या खाली लावून ठेवली होती.

Web Title: Swabhimaan tehsil president car was burnt in Sawantwadi