शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

संशयित चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, वैभववाडी पोलीसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:46 IST

vaibhavawadi, crimenews, police, sindhdurug वैभववाडी शहरातील माईणकरवाडी येथील घरातून दीड वर्षापूर्वी भरदिवसा दोन मोबाईल घेऊन पसार झालेल्या संकेत शिवराम पवार(३१, रा. उंबर्डे कातकरवाडी) या संशयिताच्या कणकवलीत मुसक्या आढळल्या. वैभववाडी पोलीसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. या गुन्ह्यातील मोबाईल पोलिसांनी या पुर्वीच ताब्यात घेतलेले आहेत. मात्र गेले वर्षभर तो गुंगारा देत होता.

ठळक मुद्देसंशयित चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, वैभववाडी पोलीसांची कामगिरी वर्षभर देत होता गुंगारा; मुद्देमाल आधीच हस्तगत

वैभववाडी : शहरातील माईणकरवाडी येथील घरातून दीड वर्षापूर्वी भरदिवसा दोन मोबाईल घेऊन पसार झालेल्या संकेत शिवराम पवार(३१, रा. उंबर्डे कातकरवाडी) या संशयिताच्या कणकवलीत मुसक्या आढळल्या. वैभववाडी पोलीसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. या गुन्ह्यातील मोबाईल पोलिसांनी या पुर्वीच ताब्यात घेतलेले आहेत. मात्र गेले वर्षभर तो गुंगारा देत होता.माईणकरवाडीतील अवधूत माईणकर यांच्या घरात कृषी महाविद्यालयातील चंचल भुते आणि रुचिरा नार्वेकर या विद्यार्थ्यीनी राहत होत्या. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी तीनच्या वाजता त्या विद्यार्थ्यीनी घरात आराम करीत होत्या. त्यावेळी अचानक एक अज्ञात व्यक्ती घरात घुसली.त्याने काही कळायच्या आतच या दोघींचे १५ हजार रुपये किमंतीचे दोन मोबाईल घेऊन पलायन केले होते. विद्यार्थ्यीनींनी आरडाओरडा केल्याने तो संशयित शुकनदी पार करुन दुचाकीने पसार झाला होता. यासंदर्भात त्या विद्यार्थ्यीनींनी वैभववाडी पोलिसांत तक्रार दिली होती.या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हे दोन्ही मोबाईल वापरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने एक मोबाईल मीरा भाईंदर तर दुसरा मोबाईल नालासोपरा येथील एका व्यक्तीला विक्री केले होते.पोलिसांनी ते दोन्ही मोबाईल ताब्यात घेतले. त्याचवेळी हे दोन्ही मोबाईल संकेत पवार याने चोरल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु गेले वर्षभर हा संशयित पोलीसांना गुंगारा देत होता. दरम्यान गुरुवारी संशयित पवार हा कणकवलीला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यामुळे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस हवालदार राजू जामसंडेकर, मारुती सोनटक्के, संदीप राठोड यांनी कणकवली येथे पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी सुरु असून शनिवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस हवालदार राजू जामसंडेकर या प्रकरणचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीvaibhavwadiवैभववाडीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग