शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसायाचा संशय, कणकवलीतील लक्ष्मी लॉजच्या मॅनेजरला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात

By सुधीर राणे | Updated: January 21, 2025 11:48 IST

लॉज मालक रडारवर

कणकवली : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या संशयावरून बसस्थानकासमोरील लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय-३२, रा. कळसुली, ता.कणकवली) याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जानवली पूलानजीक काल, सोमवारी (दि.२०) रात्री उशिरा करण्यात आली. बुधवारी (दि.१५) कणकवलीत पकडण्यात आलेल्या दोन बांगलादेशी महिलांकडून लक्ष्मी लॉज येथे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार २० जानेवारी रोजी कणकवली न्यायालयात वाढीव पोलिस कोठडीची मागणी करताना तपासी अधिकारी उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध १९५६ चे कलम ५ (१) हे लावले होते. लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओंकार याच्या मागावर पोलिस होते. तो जानवली नदी पुलाकडे येणार असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. आता लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस