शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: पंढरपुरातील सुशांत खिल्लारेचा मृत्यू मारहाणीतच, संशयितांनी वापरलेली कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 12:11 IST

मृतदेहाची विल्हेवाट लावताना आंबोली घाटात दरीत कोसळून एकाचा झाला होता मृत्यू

सावंतवाडी : पंढरपूर येथील मुकादम सुशांत अरूण खिल्लारे यांचा मृत्यू भाऊसो माने व तुषार पवार यांनी पट्याने व काठीने मारहाण केल्यानेच झाला. दहा दिवस माने याने खिल्लारे याला आपल्या घरात ठेवले असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी वापरलेली गाडीही मंगळवारी रात्री उशिरा पोलीसांनी जप्त केली असल्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.वीटभट्टी चालवण्यासाठी कऱ्हाड येथील भाऊसो माने यांनी पंढरपूर येथील सुशांत अरूण खिल्लारे याला साडेतीन लाख रूपये दिले होते. ते पैसे वसूल करण्यासाठी दहा दिवसापूर्वीच खिल्लारे याला माने व पवार यांनी पंढरपूर येथून कऱ्हाड येथे आणले होते. जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत सोडणार नाही असा पवित्रा माने याने घेतला होता. त्यातच रविवारी दारूच्या नशेत माने व पवार यांनी खिल्लारे याला बेल्ट व काठीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत खिल्लारे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी पवार यांच्या कार मधून खिल्लारे यांचा मृतदेह आंबोली येथे आणण्यात आला व तो रात्री च्या सुमारास गाड्याची वर्दळ नसल्याचे बघून घाटात टाकण्यात आला. मात्र यावेळी मृतदेह टाकताना भाऊसो माने हा पाय घसरून दरीत कोसळला आणि त्याचा ही मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर यातील तिसरा संशयित तुषार पवार यांची पोलीस कसून चौकशी करीत असून पवार यांच्या चौकशीत विसंगती आढळून येत आहे. खिल्लारे याचे नातेवाईक सावंतवाडीत आल्यानंतर रितसर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नंतरच गुन्ह्यातील मुद्देमाल ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून स्पष्ट केले.

मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात आंबोली घाटात खिल्लारेचा मृतदेह टाकतना पाय घसरून पडलेल्या भाऊसो माने यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन येथील उपजिल्हयात रूग्णालयात केल्यानंतर त्यांच्या कऱ्हाड येथील नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला मात्र खिल्लारे याचे नातेवाईक पंढरपूर येथून बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोचले नसल्याने त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.गुन्ह्यात आणखी आरोपी वाढणार खिल्लारे खुन प्रकरणात सध्या तरी एकाचा समावेश आहे.तर दुसरा आरोपी मृत पावला मात्र खिल्लारे याला दहा दिवसापूर्वी माने याने कऱ्हाड येथे आणून ठेवले होते.त्यामुळे यात आणखी कोणाचा समावेश आहे का हे पोलीस आता तपासणार आहेत 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस